Nitin Gadkari Udayanraje Bhosale esakal
सातारा

खासदार उदयनराजेंनी घेतली नितीन गडकरींची भेट; अजिंक्‍यताऱ्यासाठी केली 'ही' मागणी

'किल्‍ल्यावरील ऐतिहासिक वास्‍तूंचे अवशेष, तसेच राजसदर चौथरा अद्यापही सुस्‍थितीत आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'किल्‍ल्यावरील ऐतिहासिक वास्‍तूंचे अवशेष, तसेच राजसदर चौथरा अद्यापही सुस्‍थितीत आहे.'

सातारा : अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते खालची मंगळाई मंदिर परिसर या हवाई मार्गावर रोप-वे (Ajinkyatara Ropeway Project) उभारण्याचं निश्‍चित केलं आहे. डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांच्या परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजूंकडून आठ आसनक्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉली ये-जा करतील. त्‍यासाठी आवश्‍‍यक जागा उपलब्‍ध असून, ९२ कोटींच्‍या केबल रोप-वे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीतून करण्‍याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

लवकरच केंद्र तसेच पालिकेच्‍या माध्‍यमातून अजिंक्यतारा रोप-वेच्या उभारणीस सुरुवात होईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकाद्वारे दिली. दिल्ली इथं उदयनराजे यांनी भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेत रोप-वे प्रकल्‍पाबाबत चर्चा केली. या वेळी उदयनराजे म्‍हणाले, 'अजिंक्यतारा किल्‍ल्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्‍पकाळ वास्तव्य होते. या किल्‍ल्यावरील तळी पर्यावरण, इतिहासप्रेमींच्‍या मदतीने पुनरुज्‍जीवित केली जाणार आहेत.'

किल्‍ल्यावरील ऐतिहासिक वास्‍तूंचे अवशेष तसेच राजसदर चौथरा अद्यापही सुस्‍थितीत आहे. किल्‍ल्‍याचा विस्‍तार ७० एकरांत असून, अजिंक्यतारा सातारकरांचा अभिमान आहे. राज्‍यभरातील पर्यटक अजिंक्यतारा किल्‍ल्यास भेट देण्यास उत्सुक असतात. दरवाजापासून चढण, पायऱ्या असल्‍याने वृध्‍द नागरिकांना किल्‍ल्‍यावर जाता येत नाही. यामुळे रोप-वेचा प्रस्‍ताव केल्‍याची माहिती श्री. गडकरी यांना दिली.’’ मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या अजिंक्यताऱ्यावर रोप-वेची उभारणी केंद्राच्या निधीमधून करण्याची ग्‍वाही श्री. गडकरी यांनी दिल्‍याची माहिती उदयनराजेंनी पत्रकात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT