सातारा : लोकसभेच्या पोटनिवडणूकीत उदयनराजे भोसले यांच्या पराभवात निष्क्रीय नगराध्यक्षा माधवी कदम यांचा मोलाचा वाटा असल्याचा आरोप सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी पवार यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकार परिषदेत केला. बांधकाम सभापती सिध्दी पवार चार दिवसांपुर्वी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या काराभारावर आक्षेप घेतले होते. पवार यांचे आक्षेप माधवी कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे खाेडले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून पुन्हा आज पवार यांनी पालिकेत पत्रकार परिषदेत घेत कदमांवर टीका केली.
पवार म्हणाल्या, गेल्या चार वर्षात नगराध्यक्षा माधवी कदम यांनी साताऱ्यात स्वनिधीतून कोणतेही ठोस काम उभारलेले नाही. इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात त्या धन्यता मानत आहेत. कोणतेही राजकीय कार्य नसताना सातारकरांनी खासदार उदयनराजेंकडे बघून तुम्हाला नगराध्यक्षपदी बसविले. त्या सातारकरांची आणि खासदार उदयनराजेंची तुम्ही घोर निराशा केली आहे. शासनाच्या धोरणामुळे तुम्हाला पालिकेच्या एकूण उत्पन्नातील 20 टक्के स्वनिधी म्हणून मिळतो. या स्वनिधीतून नेमकी कोणती कामे केली, ते एकदा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सातारकरांना सांगावीत. माझ्या प्रभागातील कामे विशिष्ट हेतू डाेळ्यासमाेर ठेवून रखडविण्यात येत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
यापुर्वी सातारचे नगराध्यक्षपद अनेकांनी भूषविले आहेत. मात्र शिक्षण आणि पदाचा गर्व असणाऱ्या अशा नगराध्यक्षा आज अनेकांना पहायला मिळत आहेत. अभ्यासाच्या नावाखाली फाईली अडवून ठेवणे, हे कोणत्याही सुज्ञ नागरीकांच्या लक्षात न येणारा विषय असून नगराध्यक्षांनी त्या अभ्यासाचा उलगडा सर्वांसमक्ष करण्याचे आव्हानही पवार यांनी यावेळी दिले.
घरा घरांत मना मनांत पाेचविणा-या नेत्यावरच झाली गेम
मोदींपेक्षा राहुल गांधीच पंतप्रधानपदी योग्य ते रणबीर कपूरला कोरोनाची लागण; वाचा एका क्लीकवर
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.