उंब्रज (जि. सातारा) : चोरे येथील सेवानिवृत्त जवानाच्या पेन्शन खात्याचे एटीएम कार्ड चोरून खात्यातील पाच लाख 52 हजार काढल्याची तक्रार येथील पोलिसात दाखल झाली होती. संबंधित रक्कम चोरणारा जवानांच्या नात्यातीलच असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. नितीन अशोक पालवे (वय 29, रा. पाडळोशी, ता. पाटण) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी - चोरे येथील गोरखनाथ बंडू लोखंडे (वय 65, रा. चोरे) हे गुजरात येथील एसआरपीएफ येथून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून ते चोरे येथे राहतात. त्यांना गुजरात सरकारची पेन्शन सुरू आहे. बॅंक ऑफ इंडिया बचत खात्यात दरमहा सुमारे 18 हजार रुपयांच्या आसपास रक्कम जमा होते. त्यांचे वय झाल्यामुळे त्यांनी घराच्या भिंतीवर एटीएम कार्डचा पिन कोड लिहिला होता. ते पेन्शन काढायला जाताना भाची सुरेखा ऊर्फ ताई अशोक पालवे (रा. पाडळोशी) यांचा मुलगा नितीन पालवे यास घेऊन जात होते. मात्र कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये पैशाची आवश्यकता भासली नाही.
नेर कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर; शेतकऱ्यांचे पाण्याअभावी टळणार नुकसान
लॉकडाउनचे निर्बंध उठल्यानंतर 15 नोव्हेंबरला त्यांनी पासबुक नोंदविण्यासाठी गावातील एकाकडे दिले. पुस्तक भरल्यानंतर एक जुलै ते चार नोव्हेंबर या कालावधीत वेळोवेळी सुमारे पाच लाख 52 हजार 270 रुपयांची रक्कम खात्यावरून कोणीतरी काढल्याची त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरात ठेवलेले बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड पैशाच्या पाकिटात पाहिले असता ते पाकिटात नसल्याचे त्यांच्या निदर्शास आले. त्यानंतर त्यांनी चोरट्याने त्यांचे एटीएम कार्ड चोरून पाच लाख 52 हजार 270 रुपये काढल्याप्रकरणी उंब्रज पोलिसात फिर्याद दिली. त्याचा तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती व सायबर तंत्रज्ञानाचे आधारे पालवे या संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हवालदार हेमंत कुलकर्णी तपास करत आहेत.
अतिक्रमण हटविण्यासाठी फलटणला धरणे; मनसेचा आक्रमक पवित्रा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.