सातारा

साम, दाम, दंडाची भीती दाखवून भाजपने पळवले कॉंग्रेसचे 40 नेते : पृथ्वीराजबाबांचा गौप्यस्फोट

उमेश बांबरे

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्रामध्ये मोदी व शहा ही जोड गोळी आहे. त्यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला. तो लोकशाहीला गिळकृंत करणारा आहे. तोच आदर्श घेत राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ता असताना काम केले. सत्तेत असताना साम, दाम, दंड, भेद व भीती दाखवून 40 पेक्षा जास्त नेते भाजपात नेले. त्यात उंडाळकर काकांनाही आमिष दाखवल्याचा गौप्यस्फोट आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे केला. कऱ्हाड तालुक्‍यात झालेले मनोमिलन जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

राज्याचे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कऱ्हाडातील आजच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सातारा जिल्ह्यातील हे दोन दिग्गज नेते वैरत्व विसरून एकत्र आले, या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रयत्नातून काका-बाबा गटाचे एकत्रीकरण होत असून राज्याच्या राजकारणात या घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्यास सहप्रभारी सोनल पटेल, मंत्री विश्वजित कदम, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अध्यक्ष मनोहर शिंदे, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत मोहिते, मोहन जोशी यासह जिल्ह्यातील व कराड तालुक्यातील कॉंग्रेसजण उपस्थित आहेत. 

आमदार चव्हाण म्हणाले, काका व आमच्यामध्ये मनभेद नव्हते मतभेद होते. ते विसरून ॲड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून टाकलेले पाऊल महत्वाचे आहे. काँग्रेसची जुळणी करणे ही काळाची गरज आहे. प्रतिसरकार स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ही अवस्था होणे वाईट आहे. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र, त्या खोलात न जात काँग्रेसला जुने दिवस आणण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू. अवघड वाटत असलेतरी अजूनही स्थिती अटोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे आजचे मनोमिलन जिल्ह्यातील राजकीय दिशा बदल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरवात कऱ्हाड तालुक्‍यातून झाली आहे. निवडणूक झाल्यानंतर उदयसिंह पाटीलांची भेट झाली. त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते विलासकाकांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी घरी गेलो. तेथे चर्चा झाली तेव्हा काकांनी माझ्या घरातील एकही व्यक्ती जातीवादी पक्षात जाणार नाही. आमच्या घराला स्वातंत्र्यसैनिकांची पंरपरा आहे, असा विश्‍वास दिला. त्यातून त्यांचे आशीर्वाद घेत मनोमिलनाची पाऊले पडली. मागच्या काही गोष्टी झाल्या असतील मात्र, त्या सर्व गोष्टी विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोराताची भेट घेतली. त्यांना कऱ्हाडला येण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोमिलनाची नांदी येथे होत आहे. हे मनोमिलन जिल्ह्याला दिशा देणारे असेल. जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदल्याशिवाय राहणार नाही. 

श्री. चव्हाण म्हणाले, केंद्रामध्ये मोदी व शहा ही जोड गोळी आहे. त्यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला. तो लोकशाहीला गिळकृंत करणारा आहे. तोच आदर्श घेत राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ता असताना काम केले. सत्तेत असताना साम, दाम,दंड, भेद व भिती दाखवून 40 पेक्षा जास्त नेते भाजपात घेतले. मात्र, निवडणूकीनंतर परिस्थिती बदलली आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आली. आता त्यांचा व्यवस्थित सुरू आहे. ही सत्ता आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे. भाजप नसेल तरी चालणार हा शिरस्ता मोडीत काढला आहे. आता केंद्राची वेळ आली आहे. बहुजनांचे सरकार आणण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले आहे. त्यास जरूर यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा

अख्खं कुटुंबच उद्‌ध्वस्त झाल्याने चांदीनगरी हळहळली; शत्रूच्याही वाट्याला न यावा असा दुर्दैवी प्रसंग, नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT