सातारा

इंग्रजांना सळो की, पळो करून सोडणारी वडूजची क्रांती! आजच्या दिवशी घडला होता इतिहास!

Balkrishna Madhale

सातारा : जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा म्हणूनही ह्या जिल्ह्याने ओळख निर्माण केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वांना परिचित आहे. मात्र, या तालुक्यातील काही गावे आपल्या वैशिष्ट्याने महाराष्ट्रात प्रसिध्द पावली आहेत. या तालुक्याचे मुख्य कचेरीतील गाव वडूज हे हुतात्म्यांची भूमी आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला आहे. पण, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वडूज येथे नऊ स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण अर्पण करावे लागले आहेत.

महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या चळवळीत सारा देश खडबडून जागा झाला होता. महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडोचा आदेश दिला आणि सर्वच कार्यकर्ते मोर्चे बांधू लागले. जिल्ह्यात औंध येथील बॅ. आप्पासाहेब पंत, बंडोपंत लोमटे, गौरीहर, सिंहासने, दादासाहेब साखवळकर, नानासाहेब, आयाचित, पिलोबा वडूजकर, रामभाऊ नलवडे, माणिकचंद दोशी, बापूराव कचरे यांनी गावोगावी गुप्त बैठका घेवून ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथे मामलेदार कचेरीवर मोर्चा यशस्वी करण्याचे ठरविले.

९ सप्टेंबर १९४२ ला हा विराट मोर्चा जयराम स्वामी वडगाव येथून सकाळी ६ वाजता वडूजकडे चालत निघाला. मोर्चात १५०० लोक सामील झाले होते. वडगाव ते वडूज हे १३ मैलाचे अंतर तोडून पायी निघालेला मोर्चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा काही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी निघाला नव्हता, तर मातृभूमीच्या मुक्ततेसाठी प्राण गमविण्यासाठी व इंग्रजांच्या जुलमी छळाला प्रत्युत्तर देण्यासाठी होता. सकाळी ६ वाजता निघालेला मोर्चा दुपारी ११ वाजता वडूजला येऊन पोहोचलो व १२ वाजता कचेरीवर आला.

हद्दवाढीमुळे अशी हाेईल सातारा पालिकेची आगामी निवडणूक
 
गो-या शिपायांचा कडक बंदोबस्त होता. त्यावेळी मामलेदार अंकली तर फौजदार बिंडीगिरी होते. मोर्चा कचेरीजवळ आल्यानंतर परशूराम घार्गे यांनी खांद्यावर तिरंगी झेंडा घेऊन उभे होते. वंदे मातरम्, भारत माता की जय अशा गगनाला भिडणा-या घोषणा दिल्या जात होत्या. मामलेदार अंकली व फौजदार बिंडीगिरी यांनी मोर्चा कचेरीपासून १५० फूटावर असलेल्या गोविंदराव महादेव शिंदे यांच्या हॉटेलाजवळ अडवला. अडवून ठेवलेल्या मोर्चाने भर उन्हात तेथेच बैठक मारली. मात्र, कोणताही गुन्हा नसताना अचानक बेसावध झालेल्या मोर्चावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तरच बंदुकीचा वापर करायचा असतो आणि तोही पायावर गोळ्या मारायाच्या असतात. परंतु ब्रिटिशांच्या या निर्दयी पोलिसांनी सर्व संकेत धाब्यावर बसवून मोर्चाचे नेतृत्व करणा-या परशूराम घार्गे यांच्यावर एका मागून एक अशा गोळ्या झाडल्या आणि इतरांनाही बंदुकी चालविण्याचा हुकूम दिला.

त्यामुळे निर्दशकांची धावपळ सुरू झाली. जवळ कोणतेच हत्यार नाही. अशावेळी गोळ्यांच्या वर्षावाने जागच्या जागीच पाचजणांनी होतात्म्य पत्करले. चारजण गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांना हौतात्म्य आले. शेकडोजण कायमचे जायबंदी झाले. यात परशुराम श्रीपती घार्गे, किसन बाळा भोसले, खाशाबा मारूती शिंदे, सिदू पवार, राम कृष्णा सुतार, बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण दिगंबर खटावकर, श्रीरंग शिंदे, आनंद श्रीपती गायकवाड या ९ जणांचे मृतदेह दहिवडीला नेण्यात आले. कोणीही नातेवाईक जवळ नसताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. उलट वडगावला जाऊन लोकांचा छळ केला. वडगावचे पोलिस पाटील खाशाबा घार्गे यांना पोलिसांनी हातपाय बांधून रक्त ओकेपर्यंत बेदम मारले. याबद्दल मामलेदार अंकली व फौजदारी बिंडीगिरी यांना मात्र बढत्या देण्यात आल्या. वडूजच्या मामलेदार कचेरीवर स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून पाहणा-या हुतात्म्यांनी एका मागून एक आपले देह ठेवले.

एक नव्हे तर नऊ स्वातंत्र्यवीरांचे देह तेथे पडले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले हे वडूज येथे आले असता, त्यांनी जालीयनवाला बागसारखी एक पवित्र वास्तू बनविण्यासाठी हुतात्मा स्मारके उभे करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे या हुतात्म्यांत्या विचारांची साक्ष देण्यासाठी अनेक हुतात्मा स्मारके आहेत. क्रांतीकारकांच्या पेटलेल्या वातावरणाचा दाह खटाव तालुक्यात ब्रिटिश सत्तेला तीव्रतेने जाणवत होता. येथेच प्रति सरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणा-या नाना पाटील यांनी जनक्रांती केली.

स्वातंत्र्याच्या आंदोलनात ९ हुतात्म्यांनी जी भरीव कामगिरी केली, त्याची ओळख आजच्या नवीन पिढीला जवळजवळ नाही म्हटले तरी चालेल. कारण, स्वातंत्र्याची मधूर फळे मुक्तपणे चाखणा-या आजच्या पिढीला अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे दिव्य जीवन समजले तर त्यांनी केलेला त्याग व आजचे कर्तव्य याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचे स्मरण करणे हे क्रमप्राप्त ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT