Mayani esakal
सातारा

'रुग्णांकडून होणारी लूट थांबवा, अन्यथा आंदोलन छेडणार'

संजय जगताप

मायणी (सातारा) : येथील मेडिकल कॉलेजमधील (Mayani Medical College) कोविड सेंटरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या (Mahatma Phule Janarogya Scheme) माध्यमातून भ्रष्टाचार होत असून, रुग्णांसह शासनाची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. त्यामधील दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) जयंतीदिनी (२६ जून) फसवणूक झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसह येथील चांदणी चौकात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष विकास सकट (Vikas Sakat) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. (Vikas Sakate Gave Warning Mayani Covid Center To Stop Robbing Patients Otherwise The agitation Will Break Out)

मेडिकल कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये अनागोंदी सुरू असून, रुग्णांसह शासनाची फसवणूक केली जात आहे.

श्री. सकट यांनी दिलेली माहिती अशी : मेडिकल कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये (Covid Center) अनागोंदी सुरू असून, रुग्णांसह शासनाची फसवणूक केली जात आहे. एबीजी मशिन्स (ABG Machines) आणि तज्‍ज्ञ डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या एबीजी टेस्टचे खोटे अहवाल तयार केले जातात. कोविड सेंटरमधील रुग्णांना देण्यात येणारी औषधे दर १५ दिवसांतून जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आणली जातात. त्या औषधांची बिले रुग्णांकडे देऊन जनआरोग्य योजनेद्वारे शासनाची फसवणूक करीत आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या परवानगीने रुग्णालयात १२ व्हेंटिलेटर आणले असून, त्यांचा वापर जनआरोग्य योजनेतील रुग्णांसाठी न करता ‘पेड बेड’ साठी केला जात आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे.

सर्वसाधारण रुग्णांना ऑक्सिजन लावून तर ऑक्सिजन बेडवरील काही रुग्णांना डिस्चार्ज देतेवेळी व्हेंटिलेटर लावून फोटो काढले जात आहेत. जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांचा गैरवापर करून रुग्णांमागे शासनाची ४० हजार रुपयांची लूट केली जात आहे. रुग्णालयातील सोनोग्राफी व एक्स-रे विभागाला शासनाची परवानगी नाही. तसेच तज्‍ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना रुग्णाचे एक्सरे रिपोर्ट व सोनोग्राफी रिपोर्ट जनआरोग्यच्या प्रस्तावाला जोडले जात आहेत. ते खासगी कोविड सेंटर असतानादेखील तेथे शासकीय डॉक्टर, कर्मचारी व नोडल अधिकारी यांच्या नेमणुका कशा काय केल्या आहेत?

Covid Center

दीडशे बेडच्या कोविड सेंटरसाठी किमान तीन डॉक्टरांची गरज असताना तेथे केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहेत. तेही रुग्णांना योग्य वागणूक देत नाहीत. योजनेचा लाभ घेण्यासाठी तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या खोट्या सह्या केल्या जातात. शासनाकडून रुग्णालयाला मिळालेल्या रेमडेसिव्हिरचा लाभ गरजू रुग्णांना न होता त्याची अफरातफर करून बेकायदेशीरपणे बाहेर विकल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व बाबी गंभीर असून, त्याची नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री सातारा जिल्हा व विरोधी पक्षनेते यांना पाठविल्या आहेत.

Vikas Sakate Gave Warning Mayani Covid Center To Stop Robbing Patients Otherwise The agitation Will Break Out

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT