पाटण विधानसभा मतदार संघातील साजूरचे मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार  Sakal
सातारा

Satara News : पाटण विधानसभा मतदार संघातील साजूरचे मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार

हेमंत पवार

कऱ्हाड : सातारा लोकसभा मतदार संघाच्या पाटण विधानसभा मतदार संघातील साजुर या गावातील ३५८ मतदान केंद्र हे जुने साजुर गावात आहे. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळे हे मतदान केंद्र एक किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरी करण्यात आले आहे.

प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी न करता गुगल मॅपवर केंद्र निश्चीत केले आहे. त्याचा निषेध म्हणून साजुर जुन्या गावातील ३६८ मतदान केंद्रावरील मतदार हे मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांनी दिली.

श्री. चव्हाण म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघातील पाटण विधानसभा मतदार संघातील साजुर या गावातील ३५८ मतदान केंद्र हे जुने साजुर गावात आहे. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळे हे मतदान केंद्र एक किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका या मतदान केंद्रावर होत होत्या. सुमारे ८०० मतदार याठिकाणी आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना एक किलोमीटर जुन्या साजुर गावातील लोकांना मतदानासाठी जावे लागणार आहे.

त्यामुळे त्यांची गैरसोय होणार आहे. ही प्रशासनाची चुक आहे. त्यासाठी पाटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना यासंदर्भातील माहिती देवुन मतदान केंद्र पुर्ववत जुन्या गावात ठेवण्याची मागणी केली.

मात्र त्यांनी गुगल मॅपवर आम्ही मतदान केंद्र निश्चीत केल्याचे सांगीतले. वस्तुस्थितीची पाहणी न करता मतदारांची गैरसोय कशी होईल हे प्रशासनाने बघितले आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून साजुर जुन्या गावातील ३६८ मतदान केंद्रावर मतदान करणारे मतदार हे मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT