Satara Sakal
सातारा

Satara Assembly Election 2024 : उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

३१६५ केंद्रे सज्ज; निर्भय वातावरणात मतदान करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवर पोहोचली आहे. त्यासाठी तब्बल १६ हजार २६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरशीच्या लढती असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी यंत्रणा सर्व मतदान केंद्रांवर पोहोचली आहे.

मतदानासाठी सेक्टर ऑफिसर ४३६, केंद्राध्यक्ष ३ हजार ९५६ व इतर कर्मचारी ११ हजार ८६९ असे एकूण १६ हजार २६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाचे साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.

सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ३०९७ पोलिस कॉन्स्टेबल, तसेच २९४० होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या आठ, तर राज्य राखीव दलाची एक तुकडी नेमण्यात आली आहे. संवेदनशील ४८ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही वॉच राहणार असून, गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष पथकांचाही वॉच राहणार आहे.

वाई मतदारसंघांतील सर्वात दुर्गम चकदेव येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी पथकाला दीड तास पायी ट्रेक करून जावे लागले. दुर्गम भागात मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी आयोगाने दिलेल्या विशेष बॅकपॅकसह मतदान यंत्र देण्यात आले आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केंद्रांच्या ठिकाणी युवा, सखी, दिव्यांग, महिलांचे आदी मतदान केंद्रे सजवून तयार केली आहेत. मागील वेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदानादिवशीही जागृती केली जाणार असून, यावेळेस ७५ टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

गुगल मॅपवर शोधा मतदान केंद्रे

  • गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे गुगल टॅक करण्यात आली आहेत.

  • गुगल मॅपमुळे मतदारांना मतदान केंद्र नेमके कुठे आहे, हे समजणार आहे.

जिल्ह्यातील मतदार एकूण मतदार :

  • २६ लाख ४२ हजार ७९४

  • पुरुष : १३,३७,०७२

  • महिला : १३,०५,६०८

  • तृतीयपंथी मतदार : ११४

  • आठ मतदारसंघांत

  • ३१६५ मतदान केंद्रे

व्होटर हेल्पलाइन ॲप

  • www.ceo.maharashtra.gov.in

  • http://electoralsearch.in

  • दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲप

  • व्होटर हेल्पलाइन १९५० या क्रमांकावर एसएमएस करा

  • १९५० टोल फ्री क्रमांक

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: हॉटेलमध्ये भिजलेल्या कोंबडीसारखे बसून असलेल्यांना मुंबईत गेल्यावर कंठ फुटला : हितेंद्र ठाकूर

Mumbai Voting: मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

Supriya Sule: ऑडिओ क्लिप प्रकरण; ते सांगतील त्या ठिकाणी येऊन उत्तर देण्याची माझी तयारी, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Beed News : ‘शिक्षण फुकट असतं, तर माझं लेकरू गेलं नसतं’

Gold Price: अचानक सोनं झालं स्वस्त... पण लवकरच भाव 1 लाखांच्या पुढे जाणार; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT