वाई/चांदक : शेकडो वर्षांची संतपरंपरा समाजासाठी दिशादर्शक आहे, ही अध्यात्माची परंपरा जपण्याचे कार्य वाई तालुका वारकरी संघटना करत आहे. येथील महागणपती मंदिरासमोर आज वाई तालुका वारकरी पायी आळंदी वारीच्या दिंडीचा प्रारंभ झाला.
या वेळी तालुका वारकरी संघटना, कृष्णामाई पंचक्रोशी सोहळा, कमंडलू पंचक्रोशी पायी दिंडी, धौम्य ऋषी पायी वारी, मेरुलिंग दिंडी सोहळा एकत्र करून सर्व दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान झाले.
तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप अशोक महाराज पाटणे यांच्या हस्ते विना पूजन करून गणपती घाटावर पंचपदीने पायवारी सुरू झाली. श्री. पाटणे यांनी वाई परिसराला अध्यात्माची फार मोठी परंपरा असून, ती पुढील पिढीपर्यंत रुजवण्याचे काम समस्त वारकरी समूह करत असल्याची भावना व्यक्त केली.
या प्रसंगी युवा नेते विराज शिंदे, डॉ. नितीन सावंत यांच्यासह वारकरी संघटनेचे भरत बागल, शिवाजी चव्हाण, विजय गाढवे, बबन सपकाळ, रवी भिलारे, किशोर भोसले उपस्थित होते. सर्वोदय सेवा ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संजय जेधे, बाळासाहेब चोरघोटे, रामदास राऊत, नवीन कांबळे, अप्पा मांढरे, सूर्यकांत कणसे यांनी वारकऱ्यांना फळांचे वाटप केले.
कमंडलू पंचक्रोशी पायी दिंडी वासोळे, तुपेवाडी ते आळंदीपर्यंत ज्ञानबा तुकारामाचा गजर करत प्रस्थान झाले. दर वर्षी सामाजिक संदेश देत दिंड्या आळंदीकडे रवाना झाल्या. या वेळी वारकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडीतील वारकऱ्यांसाठी वाई तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने प्राथमिक उपचार साहित्य व औषधे देण्यात आले. या वेळी अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष प्रदीप मांढरे, प्रमोद शहा, विक्रम घोटवडेकर, अनिल चावलानी, विजयसिंह कणसे, गौरव दुदुस्कर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.