Koyna Dam Sakal
सातारा

Koyna Dam : प्रमुख धरणांत फक्त 15.96 टीएमसी साठा; पाणी-विजेचं संकट, कोयनेतील विसर्ग होणार बंद

कोयनेत (Koyna Dam) अकरा टीएमसी पाणीसाठा झाला, की विसर्ग पूर्णपणे बंद होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मॉन्सूनचे आगमन वादळ व एल निनोच्या परिणामामुळे लांबणीवर पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होण्याची भीती आहे.

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठल्याने जिल्हा प्रशासनाने धरणांतील पाणीसाठे राखीव केले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांत केवळ १५.९६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

कोयनेत (Koyna Dam) अकरा टीएमसी पाणीसाठा झाला, की विसर्ग पूर्णपणे बंद होणार आहे. त्याचा परिणाम वीज निर्मितीवर होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे (Monsoon) आगमन आणखी लांबल्यास आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

वादळ, एल निनोचा परिणामामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर गेले आहे. निम्मा जून संपला तरी साधा झिरमिर पाऊस पडेना झाला आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, तसेच जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाण्याने तळ गाठल्याने आगामी काळात पाणी व वीज संकटाचा सामना जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागण्याची भीती आहे.

मॉन्सूनचे आगमन वादळ व एल निनोच्या परिणामामुळे लांबणीवर पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होण्याची भीती आहे. प्रमुख धरणांत केवळ १५.९६ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव केले जाणार आहे. कोयनेत ११ टीएमसी पाणीसाठा झाल्यावर सर्व विसर्ग बंद होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम वीजनिर्मितीवर होणार आहे.

तसेच नदीपात्रात असलेल्या पिण्याच्या योजनांना त्याचा फटका बसणार आहे. नदीकाठच्या गावांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धरणनिहाय उपयुक्त साठा- (टीएमसीत) असा आहे : कोयना ६.०३, धोम २.०४, धोम- बलकवडी ०.६७, कण्हेर १.२७, उरमोडी २.९६, तारळी २.९९. येरळवाडी ०.१०, नेर ०.१६, मोरणा ०.४५, महू ०.७५.

धरणांतील पाणी टक्केवारी :

कोयना ६.०२, धोम १७.४१, धोम- बलकवडी १६.८८, कण्हेर १३.१८, उरमोडी ३०.७०, तारळी ५१.२७.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT