We will make a tourism plan for Satara CM Eknath Shinde 
सातारा

साताऱ्याचा पर्यटन आराखडा बनवू

एकनाथ शिंदे; मंत्रिमंडळाचे खातेवाटप तीन दिवसांत होणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा/कास - साताऱ्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या भागाच्या विकासाच्या विचार सुरू असून, त्यादृष्टीने आराखडा करून लवकरच याबाबतीत आवश्यक ते निर्णय घेतले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचे खातेवाटप होईल. आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून, आम्ही भविष्यात डबल स्पीडने काम करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावाजवळील तापोळा येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यादांच आपल्या मूळगावी तापोळा- दरे परिसरात आले होते. तापोळ्यात एकनाथ शिंदेंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

तापोळ्यात येताच त्यांनी सर्वांत आधी पद्मावती देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी त्यांना भेटायला गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. साताऱ्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या भागाच्या विकासाच्या विचार सुरू असून, लवकरच या बाबतीत आवश्यक ते निर्णय घेतले जातील. दळणवळणामुळे विकास होतो. त्यामुळे तापोळा, बामणोली भागातील दोन- तीन पूल प्रामुख्याने करून पश्र्चिम महाराष्ट्र कोकणाशी जोडला जाईल. सातारा जिल्ह्यात निसर्गसंपदा मुबलक असून, पर्यटनाचा आराखडा करून लवकरच प्रश्न मार्गी लावले जातील. पुनर्वसन व इतर प्रश्र्न सोडविण्याच्या लोकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करू. जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धोरण प्रकल्‍पही मार्गी लावू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

येत्या १५ ऑगस्ट म्हणजेच येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाला खातेवाटप होईल. आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून, आम्ही भविष्यात डबल स्पीडने काम करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘मुंबई माझी कर्मभूमी असली, तरी सातारा माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी केलेले स्वागत हे आनंददायीच असते. आमचे सरकार हे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी हे सरकार आणखी पुढे नेत आहोत. आता जनतेच्या अपेक्षाही वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.

राज्याच्या विकासासाठी दृढनिश्चय करून बाहेर पडलो. जे काही होईल ते होईल; पण आता माघार नाही, असा संकल्प, दृढनिश्चय केला. जे स्वीकारलंय ते पुढे न्यायचे आहे. महाराष्ट्र प्रगतीत एक नंबर ठेवायचा आहे. १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळाचे खातेवाटप केले जाईल.’’ बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी हुतात्मा होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले. मी मुख्यमंत्री झालो.

बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी हुतात्मा होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले. मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला असल्याचा आनंद सर्वांना झाला.

- एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT