CM ladki Bahin Yojana
CM ladki Bahin Yojana esakal
सातारा

CM ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'साठी कोण असेल पात्र? 'या' महिन्यापासून होणार अंमलबजावणी

सकाळ डिजिटल टीम

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे काढण्यासाठी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायती, महा ई सेवा कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी होत आहे.

सातारा : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM ladki Bahin Yojana) या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे काढण्यासाठी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायती, महा ई सेवा कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी होत आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज

  • रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला

  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला

  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो

  • शिधापत्रिका (रेशन कार्ड), आधार कार्ड

पात्रता

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक

असा भरा अर्ज...

योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेला ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील. भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोचपावती दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची सुवर्ण बाजी, मारियाला हरवून जिंकली स्पेन ग्रांप्री कुस्ती स्पर्धा

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT