सातारा : दरवर्षीचा हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी पूरक मानला जातो. या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती चांगली असते. या दिवसात जे खाल, ते पचेल, अशी वाक्ये जुनी लोक आजही सांगतात. पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारते.
या दिवसांत थंडीचा सामना करताना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी, शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ही ऊर्जा पुरविताना योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ले, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. हिवाळ्याच्या आहाराचे नियोजन करताना तो आहार पौष्टिक असेल; परंतु वजन वाढवणारा नसेल, याची सगळ्यांनीच काळजी घ्यावी.
हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते. त्याचबरोबर शरीराला ऊर्जेची गरजही जास्त असल्याने भूक चांगली लागते. आपल्याकडे थंडीच्या दिवसात डिंकाचे व सुकामेव्याचे लाडू करायची पद्धत आहे. हे लाडू पौष्टिक असतात. त्यामुळे या दिवसांत आहाराकडेही प्रत्येकाने विशेष लक्ष दिले पाहिजेत.
चहा, कॉफी घेणे टाळा
थंडीच्या दिवसात गरमागरम चहा व कॉपी घेण्याचे प्रमाण वाढते. मात्र, सारखा चहा किंवा कॉफी घेणे आरोग्यासाठी हितकारक नाही. हर्बल टी किंवा ग्रीन टी घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुळस, गवती चहा, आले आदींचा काढा घेणे फायद्याचे असते. नेहमीच्या चहात आले घालावे. या दिवसात भाज्यांचे सूप घेतल्यास भरपूर पोषकतत्त्वे मिळू शकतील. या दिवसांत भाज्या खूप चांगल्या प्रतीच्या व भरपूर प्रमाणात मिळतात. पालेभाज्यांचा तर हा सर्वोत्तम काळ आहे.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.