World Tourism Day 2022  sakal
सातारा

World Tourism Day : पर्यावरणपूरक पर्यटनाची अनुभूती

एमटीडीसीचा उपक्रम; महाबळेश्वर, पाचगणी, कोयनेतील पर्यटक घेणार आनंद

सकाळ वृत्तसेवा

सातारा : विविध पर्यटनस्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी आता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालत सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्यटन करता येणार आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील विविध पर्यटनांच्या ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेक, नॅचरल वॉक आदींचा मनमुराद आस्वाद देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, कोयनानगर परिसरात येणाऱ्या पर्यटकांना आगामी आठवडाभर याचा आनंद घेता येईल.

जागतिक पर्यटन दिन उद्या (मंगळवार) साजरा होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतून सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्यटनाची पर्वणी महामंडळाकडून उपलब्ध होणार आहे. यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व प्रादेशिक कार्यालये, सर्व पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब, माहिती केंद्रे, कलाग्राम आदी २९ सप्टेंबरपर्यंत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना या ठिकाणी वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजीकच्या सुरक्षित-पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेक, नॅचरल वॉक आदींचा मनमुराद आस्वाद देण्यात येणार आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजन, छोट्या मॅरेथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनांतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ्रमंती असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, कोयनानगर येथेही पर्यटन विभागाच्या वतीने उपक्रम राबविले जाणार आहेत. सध्या कास परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. यानिमित्ताने पर्यावरणपूरक पर्यटन कसे करावे? यावर पर्यटन विभागाचा भर राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT