पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : हरळी (ता. खंडाळा) येथे हरेश्वर संवर्धन टीमच्या तरुणांनी धोम-बलकवडी धरणाच्या कालव्यात पडलेल्या रानगव्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. या धाडसाबद्दल हरळी, बोरी आणि धावडवाडीच्या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की गेल्या महिनाभरापासून हरेश्वर डोंगर परिसरात दोन रानगव्यांचे वास्तव्य आहे. ते महाबळेश्वरच्या जंगलातून या परिसरात आले असावेत, असा कयास आहे. एक गवा खंडाळा तालुक्याच्या हद्दीतील धोम-बलकवडीच्या कालव्यामध्ये वाहत असल्याचे हरळी गावच्या तरुणांनी पाहिले. त्यांनी तत्काळ वनरक्षक श्री. गवळी व श्री. कांबळे यांना ही माहिती दिली. संकेत बरकडे व आप्पा बरकडे या दोन जिगरबाज तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उड्या मारल्या व गव्याला बेल्ट अडकवून एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला श्री. गवळी, कृष्णा बरकडे, ओंकार शिंदे, श्री. कांबळे व बोरी येथील दोन तरुणांनी दोरखंडाने कालव्याच्या पोटपाट असलेल्या दाऱ्यापर्यंत ओढले.
येथून गव्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. हरेश्वर डोंगराला लागलेल्या वणव्यामध्ये वनसंपदा जळून खाक झाल्याने सर्व वन्यप्राण्यांनी गावाकडे मोर्चा वळवला आहे. हा रानगवा पाण्याच्या शोधात कालव्यामध्ये उतरला असण्याची शक्यता आहे. बाहेर पडल्यानंतर तो बोरी गावच्या दिशेने गेला आहे. उभ्या पिकाची नासाडी केलेली असतानासुद्धा शेतकरी पुत्रांनी गव्याचे प्राण वाचवले. याबद्दल हरेश्वर संवर्धन ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक होत आहे.
दोन गटांतील राड्यानंतर संपूर्ण घरात पसरला रक्ताचा सडा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.