chair sakal
सातारा

सातारा : ‘मिनी मंत्रालया’साठी साखर पेरणी

नवीन रचनेनुसार निवडणुकांची शक्यता; मागील आरक्षणावर अंदाज बांधून तयारी, भेटीगाठींवर भर

हेमंत पवार

कऱ्हाड - ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोकळा झाला आहे. नव्या गट- गण रचनेनुसार या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गट व गणाचे मागील काही वर्षांचे आरक्षण गृहीत धरून लोकांच्या भेटीगाठींवर भर देत साखर पेरणी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीपूर्वीच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनी सारा ग्रामीण भाग ढवळून निघतो. अलीकडे तरुणांचाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे ओढा आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व सिद्ध करण्याची जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक हे एक साधन तरुणांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे निवडणुकीत आपल्याला संधी मिळाल्यास आपलाच पत्ता कसा ओपन होईल, यासाठी अनेक जण धडपडताना दिसत आहेत. विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सभागृहांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपली आहे. त्यामुळे तेथील कारभार प्रशासकाकडून चालवला जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाचे प्रारूप मार्च २०२२ पूर्वी राज्य निवडणूक आयोगाला सादर केले गेले. त्यात नगरपालिकांत समाविष्ट भाग वगळून दहा गट आणि २० गण वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ७४, तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १४८ होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १० मार्च २०२२ रोजीच्या स्थितीनुसारच या निवडणुका घ्यावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नव्या रचनेनुसारच होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इच्छुकांनी आतापासूनच गट- गणांत संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन, उद्‌घाटनांसह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून कार्यवाही सुरू आहे. गावोगावी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटीगाठींवरही इच्छुकांनी भर दिला आहे. कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार? याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरीही मागील निवडणुकांवेळी संबंधित गटात कोणते आरक्षण होते, याचा विचार करून आगामी आरक्षणाचे आराखडे बांधून इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे गावोगावी मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT