Robot  Sakal
विज्ञान-तंत्र

Dancing Robot: पंधरा वर्षीय मुलाने बनवला थ्रीडी प्रिंटरद्वारे नर्तक रोबोट, वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा

प्रत्येक नवी पिढी जुन्या पिढीपेक्षा एक पाऊल सदैव पुढे असते, असे म्हणतात. तसे अनेक उदाहरणे समाजामध्ये आढळतात. तंत्रज्ञानाच्या युगात नव्या पिढीच्या या गुणांना गौरवाची झालर प्राप्त झाली आहे. यापैकी एक उदाहरण म्हणजे इयत्ता दहावीत असलेला हितेन धारपुरे. पंधरा वर्षीय हितेनने थ्रीडी प्रिंटरचा उपयोग करीत नृत्य करणारा रोबोट तयार केला आहे. त्याची नोंद वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून हा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.

वानाडोंगरी येथील शाळेत दहावीत असलेला त्रिमूर्तीनगर येथील हितेनला हा रोबोट तयार करण्याची कल्पना सुचल्यानंतर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रथम तसे साहित्य गोळा केले. त्यानंतर, थ्रीडी प्रिंटरचा उपयोग करून रोबोटचे विविध भाग प्रिंट करून घेतले. या सुट्या भागांना एकत्रित केले, त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली आणि प्रोग्रॅमिंगद्वारे त्यामध्ये प्राण ओतले. पुढे त्याला संगीताची जोड देत नृत्य करण्यासाठी तयार केले.

वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स टीमने त्याच्या या कार्याची पडताळणी केल्यानंतर हितेनला ‘स्वय-निर्मित थ्रीडी प्रिंटेड रोबोट्ससह सिंक्रोनाइझ्ड डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी यंगेस्ट बॉय’ ही पदवी बहाल केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्याला भेटवस्तू देत त्याचे कौतूक केले.

दोन रेकॉर्ड, एक संशोधनही नावावर

हितेनचा हा पहिला वहिला विक्रम नाही. गेल्या वर्षी विविध अभ्यासक्रम, प्रश्नमंजूषा, राष्ट्रीय आणि ऑनलाइन स्पर्धांमध्ये सहभागी होत ८०१ प्रमाणपत्रे पाप्त केल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याची नोंद घेतली होती. तसेच, ‘एआय इंटिग्रेटेड ट्रॅफिक नॉईज ॲंड ट्रॅफिक लाइट कंट्रोलर’ या विषयातील नावीन्यपूर्ण संशोधन पेटंट म्हणून नोंद झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ...पण ही तिजोरी जनतेची आहे, हे विसरू नये, एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं, नेमकं काय म्हणाले?

Supriya Sule : वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

Traffic Route Change: भद्रकाली, नाशिकरोडला उद्याला असेल वाहतूक मार्गात बदल; जुलूस, मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन

Duleep Trophy 2024: सर्फराझ, रिंकू सिंग अपयशी, मात्र भारत ब संघासाठी कर्णधार अभिमन्यूची शतकी झुंज

Edible Oil Price Hike : 8 दिवसात तेलाच्या किंमतीत 20 ते 25 प्रति किलोने वाढल्या... गृहिणी आणि गणेश भक्तांचे बजेट कोलमडले

SCROLL FOR NEXT