Adrit Rao AI Apps eSakal
विज्ञान-तंत्र

Adrit Rao : अवघ्या 16 वर्षांचा मुलगा झालाय 'एआय'चा बादशाह; 'अ‍ॅपल'नेही केलंय कौतुक.. आता दिव्यांगांसाठी तयार करतोय अ‍ॅप!

AI Apps : वयाच्या तेराव्या वर्षापासून तो स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीसोबत मिळून हेल्थकेअर अ‍ॅप्स बनवत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये त्याने असे कित्येक अ‍ॅप्स बनवले आहेत.

Sudesh

Adrit Rao Healthcare Apps : कॅलिफोर्नियामधील भारतीय वंशाचा अद्रित राव हा मुलगा सध्या एआय जगतात चर्चेचं नाव ठरत आहे. अद्रितने आतापर्यंत कित्येक अ‍ॅप्स तयार केले आहेत. त्याला अ‍ॅपलकडून दोन वेळा पुरस्कार देखील मिळाले आहेत. आता अद्रित चक्क दिव्यांगांसाठी एक अ‍ॅप तयार करत आहे.

Signer असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे एआय-पॉवर्ड अ‍ॅप साईन लँग्वेज जेस्चर्सना रेकॉर्ड करून, त्याचं रुपांतर स्पीचमध्ये करते. यासाठी फोनच्या कॅमेऱ्याचा वापर केला जातो. या अ‍ॅपचा फायदा जगभरातील कित्येक व्यक्तींना होणार आहे. या अ‍ॅपची संकल्पना कशी सुचली, आणि त्यावर कसं काम केलं याबाबत अद्रितने माहिती दिली आहे. (Adrit Rao Signer App)

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अद्रितने आपल्या प्रवासाबाबत सांगितलं. "मी सर्वात आधी जगात किती कर्णबधिर लोक आहेत याची आकडेवारी पाहिली. यानंतर कर्णबधिर लोक आणि इतर लोकांमधील कम्युनिकेशन गॅपबाबत अभ्यास केला. त्यानंतर मला आयफोनच्या कॅमेऱ्याचा वापर करुन साईन लँग्वेज जेस्चर्सना कन्व्हर्ट करण्याची आयडिया सुचली." असं अद्रित म्हणाला.

"या काळातच अ‍ॅपलने WWDC कार्यक्रमात हँड पोझ ट्रॅकिंग आणि क्लासिफिकेशन टेक्नॉलॉजी सादर केली होती. त्यांच्याच मशीन लर्निंग मॉडेलचा वापर मी माझ्या एआय अल्गोरिदमला ट्रेन करण्यासाठी केला. यामुळे साईन-टू-स्पीच कन्व्हर्जन करणं शक्य झालं." असंही अद्रितने स्पष्ट केलं.

हेल्थकेअर क्षेत्रात मोठे बदल

अर्थात, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये हे अद्रितचं पहिलंच अ‍ॅप नाही. वयाच्या तेराव्या वर्षापासून तो स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीसोबत मिळून हेल्थकेअर अ‍ॅप्स बनवत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये त्याने असे कित्येक अ‍ॅप्स बनवले आहेत. त्याने तयार केलेलं AutoABI हे आयफोन अ‍ॅप पेरिफेरल आर्टेरिअल आजार डिटेक्ट करू शकतं. या अ‍ॅपच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत, तसंच याचं पेटंट मिळवण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं अद्रितने सांगितलं.

याव्यतिरिक्त, अद्रितने अशी एआय सिस्टीम तयार केली आहे, ज्याच्या मदतीने CT स्कॅनमध्ये एन्युरिझम (Aneurysms) शोधण्यासाठी मदत होते. तसंच स्टॅनफोर्डच्या स्पेझी इकोसिस्टीममधील मॉड्यूलर डिजिटल हेल्थ अ‍ॅपमध्येही त्याचं योगदान आहे. LLMOnFIRE या अ‍ॅपमधील त्याचं काम हे एआयचा हेल्थकेअर सेक्टरमध्ये कसा गेम-चेंजिंग वापर होऊ शकतो याचं मोठं उदाहरण आहे.

अद्रितने तयार केलेले अ‍ॅप्स

अद्रित वयाच्या आठव्या वर्षीपासूनच कोडिंग करतो. "एखादा कोड जेव्हा अ‍ॅपच्या रुपात जिवंत होतो, तेव्हा तो आनंद वेगळाच असतो", असं तो म्हणतो. कोरोना काळामध्ये माझ्याकडे करायला जास्त काही नव्हतं, तेव्हा यूट्यूब आणि इंटरनेटवरुन मी अ‍ॅप डेव्हलपमेंट शिकलो. यानंतर प्ले स्टोअरवर मी काही अ‍ॅप्स बनवले.

अद्रितने तयार केलेले काही अ‍ॅप्स -

  • MoTV - या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्सना मूव्हीज आणि टीव्ही शो शोधता येतात.

  • ShopQuick - हे अ‍ॅप कोरोना काळात ग्रोसरी स्टोअरवर किती गर्दी आहे हे दाखवण्यासाठी मदत करत होतं.

  • Virtuthon - कोरोना काळात लोकांना व्हर्चुअल वॉकॅथॉन एक्सपिरियन्स देण्यासाठी हे अ‍ॅप तयार केलं होतं.

इतरांनाही करतोय मदत

या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त अद्रित रावने Aretech Inc नावाची एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन देखील सुरू केली आहे. यामध्ये तरुण इनोव्हेटर्सना व्हर्चुअल अ‍ॅप डेव्हलपमेंट शिकवली जाते. भारतीय डेव्हलपर्सना अद्रितने सांगितलं आहे, की अ‍ॅप डेव्हलपमेंटमध्ये वय हे कधीच बंधन नसतं. थोडा वेळ दिला तर कोणीही हे शिकू शकतं. अर्थात त्यासाठी ऑनलाईन शिकण्याची इच्छा आणि क्षमता असायला हवी असंही त्याने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT