Manchester Prize AI Theme Sustainability Finalists 2024 esakal
विज्ञान-तंत्र

AI Manchester Prize : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकासाची सांगड! मँचेस्टर पुरस्काराची आकर्षक थीम, कोणती संस्था ठरणार बेस्ट?

AI Sustainability Challenge : पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या 10 संस्थांना अंतिम फेरीत

सकाळ डिजिटल टीम

UK Manchester Prize : युकेमधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांना मोठा गौरव मिळाला आहे. UKच्या Department for Science, Innovation and Technology द्वारे स्थापन करण्यात आलेल्या Manchester Prize मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या 10 संस्थांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले आहे.

या 10 संस्थांमध्ये प्रत्येकी संस्थेला £100,000 इतका प्रारंभिक निधी देण्यात येणार आहे.तसेच पुढील आठ महिन्यांत त्यांच्या कल्पनांचे कार्यरत प्रोटोटाइप बनवण्यासाठी मदत केली जाणार आहे. अंतिम विजेत्या संस्थेला £1 दशलक्ष इतका मोठा पुरस्कार मिळणार आहे.

नुकत्याच झालेल्या घोषणेत, जवळपास 300 अर्ज आले होते. या अर्जांमधून पर्यावरणपूरक अशा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ऊर्जा, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रावर अधिक भर दिला गेला आहे.

काही आघाडीच्या अंतिम फेरीतील पोहोचलेल्या संस्थांची माहिती :

Greyparrot Insights : Greyparrot ची AI वेस्ट अॅनालिटिक्स सिस्टीम कचरा sorting किंवा recycling प्लांटमध्ये येणाऱ्या प्रत्येक कचऱ्याला वेगळे करते.त्याद्वारे ते कचऱ्याचा प्रकार, ब्रँड आणि कार्बन फूटप्रिंट ओळखू शकतात. यामुळे कचरा व्यवस्थापनात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

Polaron: Polaron ही संस्था AI चा वापर करून वेगवेगळ्या मटेरियलच्या डिझाईन्सचे विश्लेषण करते आणि सर्वोत्तम उत्पादन प्रक्रिया ओळखते. त्यामुळे बॅटरीच्या क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.

CRE.AI.TIVE : हवामान बदलामुळे धान्याच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने Phytoform Labs द्वारे CRE.AI.TIVE नावाचे प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे दुष्काळ, रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारे पीक विकसित करण्यात येणार आहेत.

या अंतिम फेरीतील पोहोचलेल्या 10 संस्थांना पुढील आठ महिन्यांत आपापल्या कल्पनांचे कार्यरत प्रोटोटाइप बनवण्यासाठी मदत केली जाणार आहे. तसेच त्यांना गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यासाठी आणि बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा देखील दिला जाणार आहे. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संशोधनाला आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT