2023 Kia EV6 : किआ वाहन निर्मात्या कंपनीने आपल्या 2023 Kia EV6 कारची बुकिंग सुरू केली आहे. या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे एकदा या कारला फुल चार्ज केल्यानंतर या कारमध्ये 708 किमीची रेंज मिळू शकते.
भारतीय बाजारात EV6 चे दोन व्हेरियंट आणणार आहे. GT Line ची किंमत 60.95 लाख रुपये आणि GT Line AWD ची किंमत 65.95 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. दोन्ही किंमती एक्स शोरूम आहेत.
2023 Kia EV6 इलेक्ट्रिक कारची बुकिंग किआच्या डीलरशीपवर केली जाऊ शकते. याची बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून केली जाऊ शकते. किआने जून 2022 मध्ये EV6 ला भारतात इलेक्ट्रिक कार म्हणून लाँच केले. तेव्हापासून याची 432 यूनिट्सची विक्री झाली आहे.
2023 साठी कंपनीने आधीच 200 खरेदीदारांना विशेष अधिकार दिले आहेत. ज्यात 30 दिवसासाठी 95 टक्के बायबॅक पॉलिसी, पाच वर्षासाठी फ्री पीरियोडिक मेंटनेंस आणि बॅटरीवर 8 वर्षासाठी किंवा 1 लाख 60 हजार किमी पर्यंत वॉरंटीचा समावेश आहे.
किती रेंज
Kia EV6 ला किआचे डेडिकेटेड ईव्ही प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लेटफॉर्म (E-GMP) वर तयार करण्यात आले आहे. ही देशातील ईव्ही सेक्टर मध्ये किआचे पहिले प्रोडक्ट आहे.
किआ EV6 फुल चार्ज मध्ये ARAI प्रमाणित 708 किमी पर्यंत रेंज देण्याचा दावा करते. तर Kia EV6 WLTP- प्रमाणित (यूरोपीय मानक) 500 किमीपर्यंतची रेंज देते. ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही. EV6 व्हीकल-टू-लोड (V2L) सोबत येते. म्हणजेच कोणत्याही विजेच्या उपकरणाने याला चार्ज केले जाऊ शकते.
किआच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये भरपूर फीचर्स दिले आहेत. Kia EV6 अनेक लग्झरी ब्रँडच्या अनेक मॉडलला टक्कर देऊ शकते. Kia EV6 मध्ये मेन इंफोटेनमेंट सोबत ड्रायव्हर डिस्प्ले साठी फ्लोइंग कर्व्ड एचडी डिस्प्ले स्क्रीन दिली आहे.
जी दोन सीट मध्ये झिरो ग्रेविटी रिक्लाइन फंक्शन आहे. तर पॅनारमिक सनरूफ, अनेक चार्जिंग ऑप्शन, एम्बियंट लायटिंगसह अनेक फीचर्स दिले आहेत. कंपनी देशातील ईव्ही चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरला जबरदस्त बनवण्यासाठी काम करीत आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये किआने भारतातील पहिले आणि सर्वात वेगवान '240 kWh' चार्जर स्थापित केले आहे. आता कंपनीची योजना गेल्या वर्षा लाँचिंगवेळी 12 शहरात 15 निवडक डीलरशीपमधून 44 शहरात 60 आउटलेट पर्यंत आपल्या ईव्ही डीलरशीप फुटप्रिंचा विस्तार कररण्याची योजना बनवली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.