Social Media eSakal
विज्ञान-तंत्र

Social Media : जगातील ६५ टक्के लोक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह; दररोज सरासरी अडीच तास करतात सर्फिंग

जगभरात तब्बल ५.१९ बिलियन लोक सोशल मीडिया वापरतात.

Sudesh

माणसाच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये आता इंटरनेट आणि सोशल मीडियाचा समावेशही झाला आहे. आपला फोन जवळ नसल्यास कित्येक लोकांना अस्वस्थ वाटू लागतं, तर सोशल मीडियाशिवाय आपण राहू शकत नसल्याचंही कित्येक लोक म्हणतात.

तुम्हालाही सोशल मीडियाचं व्यसन लागलंय असं वाटत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. जगभरात तब्बल ५.१९ बिलियन लोक सोशल मीडिया वापरतात असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे. म्हणजेच, जगातील सुमारे ६५ टक्के लोक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३.७ टक्क्यांनी वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असणाऱ्या एएफपीने याबाबतचा रिपोर्ट पब्लिश केला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील लोक दिवसाचे सरासरी २ तास २६ मिनिटं एवढा वेळ सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात.

या रिपोर्टमधील माहितीनुसार, ब्राझीलमधील लोक सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ व्यतीत करतात. या देशातील लोक दिवसाचे सुमारे ३ तास ४९ मिनिटं सोशल मीडियावर स्क्रोल करतात. तर जपानचे लोक सर्वात कमी, म्हणजेच दिवसातून एक तासाहून कमी वेळ सोशल मीडिया वापरतात.

सर्वात प्रसिद्ध सोशल मीडिया अ‍ॅप्स

जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश होतो. हे तिन्ही अ‍ॅप मेटा कंपनीचे आहेत. यानंतर वुईचॅट, टिकटॉक आणि डोऊयिन या अ‍ॅप्सचा क्रमांक लागतो. त्यानंतर ट्विटर, टेलिग्राम आणि मेसेंजर हे अ‍ॅप्स लोकप्रिय आहेत. नुकतंच लाँच झालेलं थ्रेड्स हे अ‍ॅपदेखील अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. या अ‍ॅपचे जगातील १५० मिलियन यूजर्स झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Elections: बुलेटची पैज! नेता जिंकेल की नाही यावर कार्यकर्त्यांनी लावली पैज, ५०० रुपयांचा लिहून घेतला बॉण्ड

AUS vs PAK 2nd ODI : 28 वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Latest Maharashtra News Updates : काॅंग्रेसने ओबीसी आणि दलितांना एकमेकांपासून दूर ठेवले, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

TET Exam : परीक्षार्थींचे बायोमेट्रिक, फेस स्कॅन; टीईटी परीक्षेची जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी

मालिकांसाठी नाही तर 'या' साठी भारतात परतली मृणाल दुसानिस, पती नीरजने सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT