Online Crop Registration  
विज्ञान-तंत्र

Crop Registration : मोबाइलद्वारे ६२ टक्के पीकपेरा नोंदणी पूर्ण; नांदेडला 5 लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी मोहीम

Crop Seed Registration in Nanded : खरिपामध्ये पेरणी केलेल्या पिकांचा पेरा नोंदविण्यासाठी महसूल विभागाकडून दरवर्षी ई-पीक पाहणी मोहीम राबविण्यात येते. पेरणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या स्तरावरून पीकपेरा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

सकाळ वृत्तसेवा

Online Crop Registration : जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांनी खरीप हंगामात केलेल्या पिकांचा पेरा नोंदणीसाठी ता. एक ऑगस्ट ते ता. २३ सप्टेंबरदरम्यान ई-पीक पाहणी मोहीम राबविण्यात आली. यात शेतकऱ्‍यांनी मोबाइलद्वारे पीकपेरा नोंदविला. यानुसार पाच लाख सहा हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावरील ६२.२५ टक्के पेरा नोंदविल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात एकूण शेती खाते नऊ लाख ८२ हजार २८१ आहेत. शेती खात्याचे एकूण क्षेत्र १० लाख १७ हजार १८० हेक्टर आहे, तर खरिपाचे सर्वसाधारण संपूर्ण वर्ष पेरणी क्षेत्र आठ लाख १४ हजार ३६० हेक्टर आहे.

खरिपामध्ये पेरणी केलेल्या पिकांचा पेरा नोंदविण्यासाठी महसूल विभागाकडून दरवर्षी ई-पीक पाहणी मोहीम राबविण्यात येते. पेरणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या स्तरावरून पीकपेरा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

यासाठी शासनाने यंदा ता. एक ऑगस्ट ते ता. १५ सप्टेंबर या कालावधीत पेरा नोंदवावा, असे आवाहन केले होते. यादरम्यान पेरा नोंदणी कमी झाल्यामुळे नोंदणीची मुदत २३ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. या कालावधीत पाच लाख सहा हजार ४६६.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या पेऱ्‍याची नोंद झाली आहे.

प्रशासनाने खरीप हंगाम २०२४ साठी क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने; तसेच हा डाटा, माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीकविमा पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे.

या उद्देशाने ई-पीक पाहणी ॲप इंन्स्टॉल करत पीक पाहणी, पेरा नोंद घ्यावी, काही अडचणी निर्माण झाल्यास आपल्या गावचे मंडळ अधिकारी, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवकांनी ई-पीकपेरा पूर्ण करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.

तालुकानिहाय झालेली पीकपेरा नोंदणी

क्षेत्र नोंदणी हेक्टरमध्ये टक्केवारी

नायगाव ४८,२२९ ६७.५३

माहूर ३४,७९७ ५४.६२

बिलोली ४६,७७३ ७३.६२

किनवट ८०,००४ ६४.७२

कंधार ६७,२९५ ५३.२९

मुदखेड २६,४४६ ६८.८५

हिमायतनगर ३६,५२४ ७६.३९

अर्धापूर २८,४७३ ६४.७०

नांदेड ३२,०६१ ५५.९७

देगलूर ५०,०५२ ६९.६८

उमरी ३४,८२५ ५९.९६

धर्माबाद ३०,५३६ ६७.८५

लोहा ७४,२७३ ५४.३१

हदगाव ८९,८१६ ६३.४०

भोकर ५१,५६५ ५४.७६

मुखेड ७८,६८३ ५८.२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT