Hidden Android Features esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Features Tricks : तुमच्यापैकी 70 टक्के लोकांना माहितीच नसतील मोबाईलमध्ये लपलेले 'हे' 7 भन्नाट फीचर्स

Android mobile features hidden tricks : आम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लपलेल्या 7 फीचर्सबद्दल सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही सहसा वापर करत नाही. पण ते खूप कामाचे आहेत.

Saisimran Ghashi

Android mobile features tricks : अँड्रॉइड स्मार्टफोन म्हणजे केवळ फोन नाही तर एक मल्टीफंक्शनल टूल आहे. कॉल आणि मेसेजिंगच्या पलीकडे जाऊन, त्यात काही अशा लपवलेल्या सुविधा आहेत ज्या तुमचे काम सोपे करतील, उत्पादकता वाढवतील आणि तुमच्या डिव्हाइसची कार्यक्षमता अधिक प्रभावी बनवतील.

आज आम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लपलेल्या tyत्याच 7 फीचर्सबद्दल सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही सहसा वापर करत नाही. पण ते खूप कामाचे आहेत.

1. स्क्रीन पिनिंग – एका अ‍ॅपपुरती मर्यादा

तुमचा फोन दुसऱ्याला वापरायला द्यायचा आहे पण बाकी अ‍ॅप्सवरून नियंत्रण ठेवायचं आहे? स्क्रीन पिनिंग फीचर वापरा.

कसे वापराल?

सेटिंग्जमध्ये जा

सिक्युरिटी निवडा

अ‍ॅडव्हान्सडमध्ये स्क्रीन पिनिंग सक्षम करा.

2. गेस्ट मोड – डेटा प्रायव्हसीची हमी

तुमचा फोन दुसऱ्याला द्यायचा आहे पण तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा आहे? गेस्ट मोड वापरा.

कसे सक्षम कराल?

नोटिफिकेशन बार स्वाइप करा

तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा

गेस्ट मोड निवडा

3. स्मार्ट लॉक – पासवर्ड न टाकता सहज वापर

वारंवार पासवर्ड टाकण्याचा कंटाळा आला आहे? 'स्मार्ट लॉक' फीचर वापरा.

कसे सक्षम कराल?

सेटिंग्जमध्ये जा

सिक्युरिटी निवडा

स्मार्ट लॉक फीचर ऑन करा

4. सिस्टिम UI ट्यूनर – स्टेटस बार आणि नोटिफिकेशन कस्टमाईझ करा

तुमच्या अँड्रॉइडचा स्टेटस बार आणि नोटिफिकेशन सहज बदलण्यासाठी सिस्टिम UI ट्यूनर वापरा.

कसे वापराल?

क्विक सेटिंग्ज मेनूमध्ये सेटिंग्ज आयकॉन दीर्घकाळ दाबून ठेवा

स्पिन झाल्यावर फीचर सक्रिय होईल

5. क्विक अ‍ॅप स्विचिंग – एका क्लिकवर अ‍ॅप बदला

होमस्क्रीनला परत न जाता अ‍ॅप स्विच करायचे आहे? 'क्विक अ‍ॅप स्विचिंग' वापरा.

कसे वापराल?

रीसेंट अ‍ॅप बटणावर दोनदा टॅप करा

6. इन-बिल्ट स्क्रीन रेकॉर्डर – स्क्रीनवर काय चाललंय ते सेव्ह करा

स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी आता वेगळं अ‍ॅप आवश्यक नाही.

कसे वापराल?

क्विक सेटिंग्ज मेनू ओपन करा

स्क्रीन रेकॉर्डर आयकॉन निवडा आणि रेकॉर्डिंग सुरू करा

7. नियरबाय शेअर – इंटरनेटशिवाय फाइल शेअर करा

फाइल्स, फोटो किंवा अ‍ॅप्स शेअर करण्यासाठी आता इंटरनेटची गरज नाही. 'नियरबाय शेअर'चा उपयोग करा. वेगवान,सुरक्षित आणि सोयीस्कर वापर हे याचे फायदे आहेत.

तुमच्या स्मार्टफोनच्या या फिचर्समुळे तुमच्या दैनंदिन कामात सहजता येईल आणि वेळेची बचत होईल. आजच वापरून बघा आणि तुमच्या फोनचा खरा उपयोग करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur School: कोल्हापुरात मनपा शाळेत पालकांचा गोंधळ; ‘यह मत कहो खुदा से’ प्रार्थनेवर घेतला आक्षेप

IND vs AUS: ते असतील हुशार, पण...! पॅट कमिन्सने दिले टीम इंडियाला ओपन चॅलेंज, वाचा काय म्हणाला

Assembly Election: बारामतीत घड्याळ की तुतारी? कोणते मुद्दे ठरणार वरचढ? कोण जिंकणार गड? वाचा सविस्तर...

Heavy Earrings Tips: वजनदार कानातले घालून कानात होणार नाही वेदना, फॉलो करा 'या' ट्रिक्स

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क सुरू

SCROLL FOR NEXT