Infinix Smart 6 Plus google
विज्ञान-तंत्र

८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हा स्मार्टफोन ; 512GB स्टोरेज

फोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असून त्याची किंमत 7,999 रुपये आहे.

नमिता धुरी

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने मजबूत वैशिष्ट्यांसह Infinix Smart 6 Plus सादर केला आहे. स्मार्ट 6 प्लस फ्लिपकार्ट द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल. याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असून सिंगल स्टोरेजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअप आणि मजबूत बॅटरीसह येतो.

Infinix Smart 6 Plus किंमत आणि वैशिष्ट्ये

Infinix ने एकाच स्टोरेज पर्यायामध्ये Smart 6 Plus लॉन्च केला आहे. फोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असून त्याची किंमत 7,999 रुपये आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा फोन मिरॅकल ब्लॅक आणि ट्रॅनक्विल सी ब्लू कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

स्मार्ट 6 प्लस 1600 x 720 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह 6.82-इंच उंच डिस्प्ले दाखवते. स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी ड्युअल-कॅमेरा सेटअप पॅक करतो, ज्यामध्ये 8MP मुख्य कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Smart 6 Plus मध्ये रियर-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हे AI फेस अनलॉकला देखील सपोर्ट करते.

स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून एंट्री-लेव्हल MediaTek Helio G25 SoC चिप वापरली गेली आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 10W चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. आउट ऑफ द बॉक्स हा फोन Android 12 (Go Edition) वर चालतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT