Aadhaar Update : चेहऱ्यामध्ये बदल, हाताच्या ठशांमध्ये बदल होत असल्याने ऐनवेळी योजनेच्या लाभासाठी अथवा आधारकार्ड जोडण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून 10 वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करणे अपेक्षित आहे. सध्या जिल्ह्यामध्ये १३ लाख ६८ हजार १५५ आधार कार्ड अपडेट करायचे बाकी आहेत.
खूप वर्षे होऊन गेल्यानंतर माणसाच्या चेहरेपट्टीत बदल होतो, यासाठी दहा वर्षे झाल्यानंतर आधार कार्ड अपडेट करून घेतले पाहिजे, असा नियम नसला तरी प्रत्येक कार्डधारकाने स्वतःसाठी आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे आहे. आधार कार्ड बनवताना हाताचे, बोटांचे ठसे घेतले गेले; मात्र कालांतराने हे ठसे जुळण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, पेन्शनर्स, ग्रामीण भागात काबाडकष्ट करून हात खडबडीत झालेल्यांना अडचणी येतात.
ज्यांच्या हातांचे ठसे जुळत नाहीत त्यांना आयरीस स्कॅनचा पर्याय आहे. काही बॅंकांना आयरीस स्कॅन करून केवायसी करून घेण्याच्या यूआयडीएने दिलेल्या आहेत. लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करून घेतले जातात. मात्र, मोठी माणसे अपडेट करत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून ते करवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठशाअभावी येणाऱ्या समस्येतून मार्ग शक्य
बोटांचे, हातांचे ठसे येत नाहीत किंवा ज्यांना काही दुखापतीमुळे बोटे किंवा हात नसतील त्यांचे आयरिस स्कॅन करून घेतले जातात. डोळ्यांच्या बुबुळाचे स्कॅनिंग होते. त्यामुळे दृष्टी नसणाऱ्यांच्याही बुबुळाचे स्कॅनिंग होऊ शकते. प्रायोगिक तत्त्वावर बॅंकांना अशा प्रकारचे मशीन बसवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे हाताचे ठसे जुळत नसले तरी आयरिस स्कॅन करून आधार कार्ड अपडेटेशला ठशाअभावी येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढला जाऊ शकतो, असे जिल्हा प्रकल्प अधिकारी महेश गोले यांनी सांगितले.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये आधार केंद्रामार्फत जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडे माहिती कळवली जाते. प्रकल्प कार्यालयाकडून मुंबईमधील आधार कार्यालयाकडे कळवल्यानंतर तिथून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे इतर कागदपत्रांची पूर्तता करून त्यासाठीच्या विशेष आधार केंद्रात अपडेट किंवा नोंदणी करून दिली जाते,असे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.