भारतीय आंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आपलं पहिलं सौर मिशन आदित्य एल१ लाँच करणार आहे. यासाठीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. चांद्रयान३ च्या यशानंतर सर्व जगाचे लक्ष भारताच्या या सौर मोहिमेकडे आहे. शनिवारी सकाळी ११.५० वाजता श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ लाँच करण्यात येईल.
आदित्य एल-१ हे १५ लाख किलोमीटर प्रवास केल्यानंतर लॅग्रेंज पॉइंट - १ येथे पोहचेल. येथून सुर्य स्पष्ट सहज पाहाता येईल. येथे पोहचल्यानंतर मिशन जवळपासच्या परिस्थितीची माहिती घेईल आणि वेगवेगळ्या डेटाचा अभ्यास करेल. आदित्य एल१ सौर कोरोना वरील डेटा तसेच व्हिज्युएल इमिशन लाइनचा अभ्यास खरेल. या अभ्यासासाठी अनेक प्रगत उपकरणे आदित्य एल१ सोबत पाठवण्यात येतील.
आदित्य एल१ नेमकं कसं काम करेल याबद्दल बेंगळुरू येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रॉफिजिस्क (आयआयए) चे प्रोफेसर जगदेव सिंह यांनी हिंदुस्तान टाइम्सला माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, आदित्य एल१ सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले समर्पित वैज्ञानिक मिशन आहे. सुरूवातीची योजना याला ८०० किमी खाली पृथ्वीच्या कक्षेत लाँच करण्याची होती, मात्र २०१२ मध्ये इस्त्रोसोबतच्या चर्चेनंतर हा न मीशन एल१ (लॅग्रेंज पॉइंट १) च्या भोवताली एका हॅलो कक्षेत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कक्षा पृथ्वीपासून सुर्याच्या दिशेने १५ लाख किमी अंतरावर आहे.
हे मिशनच्या माध्यमातून आपण सुर्याच्या विविध अंगचा अभ्यास करता येणे शक्य होमार आहे. यामध्ये तापमान प्लझ्माचा देखील समावेश आहे. प्लाझ्मा तापमान इतके अधिक का असते, अशी कोणती प्रक्रिया आहे ज्यामुळे थंड प्लाझ्मा गरम होतो इत्यादीते निरीक्षण करता येणार आहे. यामुळे आपल्याला पृथ्वीपर्यंत पोहचणाऱ्या कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) ला लागणारा वेळ आणि गतीचा योग्य अंदाज करता येण्यास मदत होईल.
जरी आदित्य एल१ ची कल्पना २०१२ मध्ये केली असली तरी तरी याला आकार देण्याचे काम खूप आधीपासून सुरू झाले होते, असेही त्यांनी सांगितले.
मिशनचा कालावधी काय असेल?
मिशनचा कालावधी आणि सूर्याचा अभ्यास याबद्दल सिंह यांनी सांगितले की, यासाठी १२७ दिवसांचा वेळ लागणार आहे. हे अंतराळ यान इच्छित ठिकाणी पोहचण्यास १२७ दिवस त्यानंतर काही अभ्यास पुर्ण केले जातील. पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्चपर्यंत डेटा मिळणे सुरू होईल. साधारणपणे एखादा उपगृह पाच वर्ष राहावा यासाठी योजना बनवलेली असते. जी किमान मिशन लाईफ आहे मात्र आपल्याला १० ते १५ वर्षांपर्यंत डेटा मिळणे सुरू ठेवले जाऊ शकते.
सिंह यांनी पुढे बोलताना सांगितले की, उपगृह एल१ येथे स्थापित करण्यात येणार आहे, जो एक स्थिर बिंदु आहे आणि येथे आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. ही कक्षा स्थिर असेल. यामुळे मिशन लाइफ अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्यांदाच सौर कौरौना, प्लाझ्मा गरम होणे आणि क्रोमोस्फीयर पासून ते कोरोना पर्यंत उर्जा ट्रान्सफर यांच्या भूमिकेचा अभ्यास केला जाईल. आम्ही मोठ्या प्रमाणात डेटा मिळण्याची वाट पाहात आहोत. आतापर्यंत कोणीही अशा प्रकारे डेटा मिळवू शकलेला नाहीये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.