ISRO Aditya L1 : भारताचे पहिले सूर्य मिशन असलेल्या आदित्य एल-1 स्पेसक्राफ्टने चौथे अर्थ-बाऊंड ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वीपणे पूर्ण केले आहे. भारतीय स्पेस एजन्सी 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन' (ISRO) ने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाल्यास अर्थ-बाऊंड ऑर्बिट मॅन्यूव्हर म्हणजे पृथ्वी भोवती फिरताना गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून स्पेसमधील प्रवासासाठी स्पीड जनरेट केली जाते.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवण्यात आलेलं आदित्य एल-1 ही भारताची पहिली स्पेस ऑब्जर्वेटरी आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये पाच लँग्रेज पॉइंट आहेत. लँग्रेज पाँइट असा बिंदू असतो जेथून सूर्य कुठलेही ग्रहण किंवा अडथळ्याविना पाहणे शक्य होईल. आदित्य एल-1 स्पेसक्राफ्ट हे लँग्रेज पाँइट 1 वर पाठवलं जात आहे. पृथ्वीपासून लँग्रेज पाँइट1 चे अंतर 15 लाख किलोमीटर आहे. तर सूर्यचे पृथ्वीपासूनचे अंतर १५ कोटी किलोमीटर आहे.
इस्रोने काय सांगितले?
इस्रोने ट्विट केले की, 'फोर्थ अर्थ बाउंड मॅन्यूव्हर (EBN#4)' यशस्वी झाले आहे. इस्रोच्या मॉरिशस, बेंगळुरू, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर आणि पोर्ट ब्लेअरमधील ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून या उपग्रहाचा मागोवा घेण्यात आला. आदित्य L-1 साठी, फिजी बेटावरील ट्रांसपोर्टेबल टर्मिनल पोस्ट-बर्न ऑपरेशनसाठी स्पेसक्राफ्टची मदत करेल. आदित्य L-1 स्पेसक्राफ्ट 256 किमी x 121973 किमी अंतरावर आहे. भारतीय अंतराळ एजन्सीने म्हटले आहे की पुढील मॅन्यूव्हर ट्रान्स-लॅग्रेजियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता केली जाईल.
लॅग्रेंज पॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी 110 दिवस लागणरा
आदित्य L-1 अंतराळयानाचे पहिले, दुसरे आणि तिसरे अर्थ-बाऊंड मॅन्यूव्हर 3, 5 आणि 10 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाले. इस्रोचे स्पेसक्राफ्ट 16 दिवस पृथ्वीभोवती फिरणार आहे. या मॅन्यूव्हर दरम्यान, पुढील प्रवासासाठी आवश्यक वेग प्राप्त केला जाईल. पाचव्या अर्थ-बाऊंड मॅन्यूव्हरच्या यशस्वी पूर्ततेनंतर, आदित्य एल-1 त्याच्या 110 दिवसांच्या प्रवासासाठी लॅग्रेंज पॉइंटकडे रवाना होईल.
अंतराळयानाद्वारे सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे इस्रोने म्हटले आहे. आदित्य L-1 सोबत अनेक प्रकारची उपकरणे पाठवण्यात आली असून, त्याद्वारे सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. सोलर फ्लेअर्स, कोरोनल मास इजेक्शन यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.