Aditya L1 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Update : 'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी; आता 71 हजार किलोमीटर उंचीवर पोहोचला उपग्रह

ISRO Sun Mission : आदित्य एल-१ ही भारताची पहिली सौर मोहीम आहे.

Sudesh

आदित्य एल-1 चे तिसरे अर्थ-बाऊंड ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं आहे. यानंतर हा उपग्रह पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचला आहे. इस्रोने एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

ऑर्बिट मॅन्यूव्हर प्रक्रियेच्या माध्यमातून एखादा उपग्रह आपली कक्षा बदलतो. आदित्यलाही आधीच्या कक्षेतून वरच्या कक्षेत पाठवण्यात यश मिळालं आहे. इस्रोच्या बंगळुरू येथील केंद्रावरुन ही प्रक्रिया पार पडली.

यावेळी मॉरिशस, बंगळुरू, श्रीहरीकोटा आणि पोर्ट ब्लेअर याठिकाणी असणाऱ्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशन्सवरून 'आदित्य'ला ट्रॅक करण्यात आलं. सध्या हा उपग्रह 296x71,767 किलोमीटर या कक्षेत पोहोचला आहे. यापुढील ऑर्बिट मॅन्यूव्हर हे 15 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे दोन वाजता पार पडेल.

आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. 2 सप्टेंबर रोजी याचं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं होतं. सूर्याचा अधिक जवळून अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT