affordable and best 5g smartphone under 14000 rupees in india check list here  
विज्ञान-तंत्र

स्वस्तात 5G स्मार्टफोन शोधताय? हे आहेत 14 हजारांत मिळणारे बेस्ट फोन

सकाळ डिजिटल टीम

Best 5g smartphone under 14000 : सध्या भारतात 5G स्मार्टफोनची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. बरेच जण आता 5G फोन खरेदीला पसंती देत असल्याने कंपन्या मध्यम श्रेणीपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत 5G फोन लॉन्च करत आहेत.अशा परिस्थितीत, जर तुम्हीही परवडणारा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही यादी तुमच्यासाठी आहे. आज आपण 5 बेस्ट 5G फोन्सबद्दल जाणून घेणार आहोत जे 14 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात.. (affordable and best 5g smartphone under 14000 rupees in india check list here)

1. POCO M4 5G (किंमत 11,999)

या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे . यासोबतच तुम्ही स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवू शकता. यात 6.58 इंच फुल एचडी + डिस्प्ले दिली आहे. तसेच यात 50MP + 2MP रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.

2. Redmi Note 10T 5G (किंमत रु. 11,999)

या फोनमध्ये 6.5-इंच FHD + 2400x1080 डॉट डिस्प्ले, 90Hz हाय रिफ्रेश रेट डिस्प्लेसह MediaTek Dimensity 700 octa-core प्रोसेसर आहे. त्याच्या मागील कॅमेरामध्ये 48MP सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि 8MP फ्रंट सेन्सर दिलेले आहे. तसेच या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

3. MOTOROLA G51 5G (किंमत रु. 12,999)

हा मोटोरोला स्मार्टफोन 6.8-इंच फुल HD+ डिस्प्ले, 50MP + 8MP + 2MP रिअर कॅमेरा, 13MP फ्रंट कॅमेरासह येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 480 Pro प्रोसेसर दिले आहे.

4. POCO M4 Pro 5G (किंमत 12,999)

या Poco फोनचे सर्वात मोठे फीचर म्हणजे त्याचा कॅमेरा. फोनमध्ये 50MP + 8MP रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 810 प्रोसेसर दिला आहे.

5. Realme 9 5G (किंमत रुपये 13,480)

फोनमध्ये 4 GB रॅम, 64 GB स्टोरेज दिला आहे. यात 6.5-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले, 48MP + 2MP + 2MP रिअर कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसर दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT