रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपला स्वस्त स्मार्टफोन लॉंच केला आहे. जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) बाजारात आला आहे. 4 नोव्हेंबरपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. याची किंमत 6,499 रुपये आहे. ईएमआय प्लॅनमध्ये 1999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करण्याचा ऑप्शनही खरेदीदारांकडे आहे. मात्र JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी Realme, Xiaomi, Samsung आणि इतर काही कंपन्यानी त्यांचे बजेट फोन्स बाजारात उतरवले आहेत. त्यामुळे या बजेट सेगमेंटमध्ये तुम्हाला जिओफोन नेक्स्टसोबत अनेक ऑप्शन्स मिळतात. आज आपण जिओफोन नेक्स्ट तुलनेत कोणते ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहेत ते जाणून घेऊयात.
Realme C11 2021
Realme C11 2021 या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये असून हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Realme UI 2.0 वर चालतो. यात 8MP रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये 5,000mAh बॅटरी दिली असून ती वायर्ड रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करते.
Samsung Galaxy M01 Core
Samsung Galaxy M01 Core ची किंमत 5,499 रुपयांपासून सरु होते, दरम्यान हा सॅमसंगच्या स्वतःच्या One UI सह हा स्मार्टफोन Android Go वर चालतो. तुम्हाला या हँडसेटमध्ये 5.3-इंच HD+ TFT स्क्रीन आणि मीडियाटेक 6739 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे सपोर्ट देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये 3,000mAh बॅटरी आहे आणि ती 11 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते.
Nokia C01 Plus
Nokia C01 Plus ची किंमत 5,999 रुपये आहे. हा हँडसेट Android 11 (Go Edition) ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि यामध्ये तुम्हाला 5.45-इंचाचा HD+ डिस्प्लेस 3,000mAh बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमधील बॅटरी बदलण्यायोग्य आहे. हे Unisoc SC9863a 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित असून यात तुम्हाला सेल्फीसाठी 2MP कॅमेरा देखील मिळतो.
Redmi 9A
Redmi 9A मध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये असून यामध्ये Helio G25 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळतो. याच्या मागील बाजूस 13MP प्राथमिक कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5MP कॅमेरा दिलेला आहे. डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 10 वॅट वायर्ड चार्जरसह येते.
Infinix Smart 5A
Infinix Smart 5A ची किंमत 6,499 रुपये असून यात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज क्षमता आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio A20 octa-core प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे आणि Android 11 (Go Edition) वर चालतो. सेल्फीसाठी फोनच्या समोर 8MP सेन्सर आहे.
Micromax IN 2B
Micromax IN 2B ची किंमत 7,999 रुपये आहे. स्मार्टफोन 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज ऑफर करतो. या फोनला Unisoc T610 octa-core प्रोसेसर सपोर्ट दिला असून Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनच्या मागील बाजूस, 13MP+2MP ड्युअल कॅमेरा आणि पुढील बाजूस 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
Lava Z1
Lava Z1 ची किंमत 5,499 रुपये आहे आणि यामध्ये 2GB रॅम, स्टोरेज क्षमता 16GB मिळते. हँडसेट MediaTek Helio A20 चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे आणि 5MP प्रायमरी कॅमेरा ऑफर करतो. सेल्फीसाठी यामध्ये तुम्हाला 5MP सेन्सर देण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.