affordable laptops for student under 35000 see price and features list Google
विज्ञान-तंत्र

खिशाला परवडतील असे विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लॅपटॉप, पाहा यादी

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या मुहूर्तावर बरेच जण नवीन वस्तू खरेदी करतात, तुम्ही देखील लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बेस्ट परफॉर्मीग ल पन्नास हजारापर्यंत पैसे मोजावे लागू शकतात. मात्र तुमच्या दैनंदिन वापरासाठी किंवा वेब ब्राउझिंग, व्हिडीओ कॉल्स आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी लॅपटॉप शोधत असाल तर तुम्हाला 35,000 रुपयांखाली बरेच चांगले ऑप्शन उपलब्ध आहेत. या पैकीच 35,000 रुपयांखाली भारतात मिळू शकणारे काही बेस्ट लॅपटॉप आज आपण जाणून घेणार आहोत.

Avita PURA NS14A6ING541 IBB

Avita PURA NS14A6ING541 IBB या लॅपटॉपची किंमत 24,990 रुपये असून या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 14-इंच HD TFT IPS डिस्प्ले आणि AMD APU ड्युअल कोर A6 9220e प्रोसेसर देण्यात आला असून, AMD Radeon R4 GPU सह जोडलेले आहे. हे 256 जीबी एसएसडी स्टोरेज आणि 8 जीबी रॅमसह येतो. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.

Lenovo Chromebook 14e 81MH0037HA

लेनोवो क्रोमबुक 14e 81MH0037HA ची किंमत 29,990 रुपये असून यात 1920x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 14-इंच फुल एचडी टच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाइस AMD APU A6-9220C प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जो 8GB RAM आणि 32GB eMMC स्टोरेजसह येतो. लॅपटॉपमध्ये AMD Radeon R5 ग्राफिक्स दिलेले आहे आणि हा Google Chrome OS वर चालतो. कंपनीचा दावा आहे की यात 10 तासांची बॅटरी लाइफ मिळेल.

Asus E410MA EK103TS

Asus E410MA-EK103TS ची किंमत 32,990 रुपये आहे. यात 14-इंच फुल एचडी एलईडी बॅकलिट अँटी-ग्लेअर डिस्प्ले दिला आहे. हे इंटेल पेंटियम सिल्व्हर एन 5030 ने सुसज्ज असून याला इंटेल यूएचडी ग्राफिक्स 605 जोडलेले आहे. हा लॅपटॉप 8 GB रॅमसह 256 GB SSD सह येतो आणि हे डिव्हाइस मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि एमएस ऑफिससह देण्यात येतो.

Asus VivoBook 15 X515JA BR381T

Asus VivoBook 15 X515JA-BR381T ची किंमत 34,990 रुपये असून या लॅपटॉपला 10 व्या जनरेशनच्या इंटेल कोर i3 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात 15.6-इंच फुल एचडी डिस्प्ले, 4 जीबी रॅमसह 1 टीबी हार्ड डिस्क स्टोरेज मिळेल. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.

Acer Aspire A315 23

Acer Aspire A315-23 ची किंमत 34,990 रुपये आहे. यात 15.6-इंच फुल HD Acer ComfyView LED-backlit TFT LCD डिस्प्ले दिला आहे. डिव्हाइसमध्ये AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर दिले आहे जे 4GB RAM आणि 256GB SSD सह येते. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT