Affordable nokia c21 plus launched in india with 3 day battery life starts at rs 10299 check details  
विज्ञान-तंत्र

Nokia ने भारतात लॉन्च केला स्वस्तात मस्त फोन, 3 दिवस चालेल बॅटरी

सकाळ डिजिटल टीम

Nokia C21 Plus Launched in India : नोकियाने आज नोकिया सी21 प्लस स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. कंपनीने हा एक स्वस्त फोन म्हणून बाजारात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे आणि कंपनीचा दावा आहे की फोन पूर्ण चार्ज केल्यावर 3 दिवस चालेल. हा स्मार्टफोन मागील रिअर फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे आणि दोन वर्षांसाठी क्वार्टर्ली सेक्युरिटी अपडेटदेखील देण्यात येईल. (Affordable nokia c21 plus launched in india with 3 day battery life starts at rs 10299 check details)

फोनची किंमत आणि ऑफर्स

नकतेच लॉंच करण्यात आलेला Nokia C21 Plus स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 10,299 रुपये आहे. त्याच वेळी, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह व्हेरिएंटची देशात किंमत 11,299 रुपये आहे. आत्तापर्यंत, हे फक्त नोकिया इंडिया ई-शॉपद्वारे भारतात उपलब्ध आहे. Nokia C21 Plus वॉर्म ग्रे आणि डार्क सायन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

नोकिया वायर्ड बड्स मिळणार फ्री

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कंपनी नोकिया C21 प्लस स्मार्टफोनच्या खरेदीवर इच्छुक खरेदीदारांना अनेक लॉन्च ऑफर देखील देत आहे. कंपनीने सांगितले की ती प्रत्येक स्मार्टफोन युनिटसोबत नोकिया वायर्ड बड्स पाठवेल. याशिवाय, कंपनी सर्व Jio ग्राहकांना 4,000 रुपयांच्या बेनिफीट्ससह 10 टक्के अतिरिक्त सूट देखील देत आहे.

Nokia C21 Plus मध्ये काय खास आहे?

या स्मार्टफोनची खासियत म्हणजे 2.5D कव्हर ग्लाससह 6.517-इंचाचा LCD डिस्प्ले, 20:9 चा आस्पेक्ट रेशो आणि 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसरसह 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेज स्पेससह येतो. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येते. हा फोन Google च्या Android 11 Go Edition मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 13MP प्राइमरी आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळतो. समोर 5MP सेल्फी शूटर आहे. फोन मध्ये देण्यात आलेली बॅटरी तीन दिवसांपर्यंत बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ब्लूटूथ 4.2, 3.5 मिमी जॅक, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि यूएसबी 2.0 पोर्ट देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT