affordable oneplus nord ce 3 lite launched in india check price specifications and features  
विज्ञान-तंत्र

OnePlus Nord CE 3 Lite : 108MP कॅमेरासह वनप्लसचा परवडणारा फोन लाँच; कमी किमतीत मिळतील दमदार फीचर्स

रोहित कणसे

OnePlus ने भारतात आपला सामान्यांच्या खिसाला परवडणारा फोन OnePlus Nord CE 3 Lite लॉन्च केला आहे. हा फोन 6.72 इंच डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सह सादर करण्यात आला आहे.

फोनमध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर आणि 16 GB पर्यंत RAM साठी सपोर्ट दिला आहे. OnePlus Nord CE 3 Lite दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो आणि फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट दिला आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि इतर फीचर्स.

OnePlus Nord CE 3 Lite ची किंमत किती?

OnePlus Nord CE 3 Lite हा फोन 19,999 रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. OnePlus Nord CE 3 Lit पेस्टल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रे कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येईल.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

OnePlus Nord CE 3 Lite चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे, जो 1,800 x 2,400 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. डिस्प्लेसोबत 120 Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिस्प्लेसह, 680 मिट्सची ब्राइटनेस आणि 240Hz चा टच सॅम्पलिंग रेट मिळतो. डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास सपोर्ट करण्यात आला आहे.

फोनमध्ये 6nm स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM सह 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज मिळते. RAM ही 16 GB पर्यंत वाढवता येते. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Android 13 आधारित OxygenOS 13 फोनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये स्टिरीओ स्पीकरचाही सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेरा

वनप्लसच्या नवीन फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 108 मेगापिक्सल्सचा फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. दुसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे आणि तिसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 1080p 30fps पर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात.

बॅटरी

OnePlus Nord CE 3 Lite 5,000mAh बॅटरी मिळते आणि फोन 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, GPS/A-GPS, GPS आणि USB टाइप-सी पोर्टसाठी सपोर्ट करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Baramati: राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची; शर्मिला पवार व अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर...

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT