Washing Machine with Dryer eSakal
विज्ञान-तंत्र

Washing Machine with Dryer : केवळ धुवूनच नाही, तर कडक वाळवूनही मिळतील कपडे; पावसाळ्यात कामी येतील या भन्नाट वॉशिंग मशीन

जवळपास सर्व वॉशिंग मशीन धुतल्यानंतर कपडे 'स्पिन' करुन देतात..

Sudesh

पावसाळ्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे सूर्यनारायणाचं दर्शन होणं अवघड होतं. सलग काही दिवस उनच पडत नसल्यामुळे कपडे वाळत नाहीत ही तक्रार सगळ्यांचीच असते. तुमचीही हीच तक्रार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीनमधून कपडे धुवून मिळतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जवळपास सर्व वॉशिंग मशीन धुतल्यानंतर कपडे 'स्पिन' करुन देतात. यामुळे कपड्यातील पाणी भरपूर प्रमाणात निघून जातं. मात्र, तरीही हे कपडे ओलेच असतात.

ड्रायर गरजेचा

यामुळेच, कपडे पूर्णपणे वाळवून मिळावेत यासाठी वॉशिंग मशीनमध्ये ड्रायर असणं गरजेचं असतं. तुम्ही जर नवीन वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला ड्रायर असलेल्या काही वॉशिंग मशीन्सची माहिती देणार आहोत. यांपैकी काही मशीन्स तर अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

IFB

आयएफबी कंपनीची 5.5 किलो क्षमतेची फ्रंट लोड फुल्ली-ऑटोमॅटिक ड्रायर वॉशिंग मशीन हा एक उत्तम पर्याय आहे. ही मशीन तुम्हाला अवघ्या एका तासात कपडे धुवून आणि वाळवून देईल. एका छोट्या कुटुंबासाठी हे अगदी परफेक्ट वॉशिंग मशीन आहे. याची किंमत 21,490 रुपयांपासून सुरू होते.

Onida

ओनिडा कंपनीची टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन देखील एक चांगला आणि परवडणारा पर्याय आहे. तब्बल आठ किलो क्षमतेची ही मशीन मोठ्या कुटुंबासाठी अगदी योग्य आहे. तसंच, 5 स्टार रेटिंगसोबत येत असल्यामुळे ही मशीन वीजेची देखील बचत करते. याची किंमत ही अवघी 15,490 रुपये आहे.

Bosch

तुम्हाला ब्रँडेड मशीन वापरण्याची आवड असेल, तर बॉश कंपनीची वॉशिंग मशीन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. Bosch Inverter front load washer dryer असं या वॉशिंग मशीनचं नाव आहे. यामध्ये नऊ किलोचा वॉशर आणि सहा किलोचा ड्रायर मिळतो. इतर मशीन्सच्या तुलनेत ही 65% कमी वेळ घेते, आणि 50% कमी वीज वापरते असा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत ही 54,990 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT