Artificial Intelligence - मित्रहो AI हा एक शब्द नाही. तर हा जागतिक बदल आहे. आपल्या दैनंदिन जीवनात AI मुळे अनेक महत्वपूर्ण बदल होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यापासून ते नवीन स्टार्टप सुरु करणांऱ्यापर्यंत याचे परिणाम होत आहेत. पण आपल्या मनात एक प्रश्न स्वाभाविकपणे आलाच असेल.
AI म्हणजे नेमकं काय ? याची निर्मिती कोणी केली ? याचे काम कसे चालते ? याचं प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामधून समजून घेणार आहोत. खर तर या विषयावर एक पुस्तक लिहता येईल पण आपण मोजक्या आणि मार्मिक अर्थासह थोडक्यात समजून घेऊया.
AI म्हणजे काय ?
आर्टिफिशल इंटेलिजन्स ला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. AI आर्टिफिशल इंटेलिजन्स हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. संगणक प्रणालीद्वारे माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करते. याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन माणसासारखे बोलू शकते,वाचू शकते अनेक गोष्टी मांणसापेक्षाही अधिक सहज करते.
विनोदाने अनेकजण म्हणतात माणूस आळशी आहे, AI अजिबात आळशी नाही. थोडक्यात काय तर माणसाच्या डोक्याप्रमाणे बोलणे,वाचणे, आवाज ओळखणे, एकमेकांशी संवाद साधने इत्यादी अनेकप्रकारची कामे AI मुळे होतात. यामुळे माणूस आळशी होतेय हे नाकारता येत नाही.
AI चे काम कसे चालते ? AI ची निर्मिती..
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे याचे काम चालते. आपल्या घरापासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये याचा वापर केला जातो.रिटेल,शॉपिंग,फॅशन,सुरक्षा,क्रीडा, उत्पादनं डेटा अॅनालिसिस यांसारख्या क्षेत्रात वापर होतो. यामुळे माणसाचे कष्ट कमी झाले आहे.जॉन मॅककार्थी यांनी १९५६ साली आर्टिफिशल इंटेलिजन्स चा शोध लावला. पण मिळालेत्या माहितीनुसार जेफ्री हिंटन यांना AI चे गॉडफादर म्हणून ओळखतात.
AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात होतो. रोज वापरणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये ऍप्लिकेशन हे AI चे उदाहरण आहे. AI Camera, Chat Bots, Google Lens, Google Assistant, Alexa हे AI द्वारे चालतात.
मराठीत एक म्हण आहे 'अति इथे माती' त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अति वापर घातकचं असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य वापर केला तर मानवी जीवन सुखकर होईल यात शंका नाही, वेगाने वाढणाऱ्या AI तंत्रज्ञानाविषयीच्या गोपनीयतेचे उल्लंघन, घोटाळे, चुकीची माहिती मिळू शकते, याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.