AI-Based Sugarcane Production Enhancement Project esakal
विज्ञान-तंत्र

Sugarcane Production : ‘एआय’द्वारे ऊस उत्पादनवाढीचा प्रयोग ठरला यशस्वी; 'या' हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ,जाणून घ्या

Pune AI Project : शरदचंद्र पवार यांनी केले आधुनिक शेती विस्तार प्रकल्पाचे उद्‍घाटन

Saisimran Ghashi

Pune : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरातून उसाचे उत्पादन वाढविणारा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे शनिवारी (ता. २२) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येणार आहे.

पुण्यात शरदचंद्र पवार आधुनिक शेती विस्तार प्रकल्पाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला ट्रस्टचे विश्‍वस्त प्रतापराव पवार, अध्यक्ष राजेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मागील तीन वर्षांपासून बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या लोकार्पणानिमित्त निवडक प्रगतशील शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी लागणारे ‘फसल’ माती परीक्षण कीटसह इतर अत्याधुनिक उपकरणे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ऊस शेती राज्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ऊस शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात इतर शेती उत्पादनांवरही ‘एआय’चा प्रयोग केला जाणार आहे.

...असा झाला ‘एआय’चा वापर

१ उपग्रह तंत्रज्ञान

जमिनीची सुपीकता, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, अन्नद्रव्ये, कर्ब आणि मातीच्या घनतेची माहिती मिळते. कुठले पीक कधी घ्यायचे आणि पिकांच्या निरीक्षणाद्वारे अद्ययावत माहिती शेतकऱ्याला मिळते. ३० टक्क्यांहून अधिक उत्पादनात वाढ.

२ ड्रोन तंत्रज्ञान

पिकाचे आरोग्य, कीड व रोग ओळखणे, अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करता येते. कमी वेळेत जास्त क्षेत्रात फवारणी . प्रती एकर ५०० ते ७०० रुपये खर्च.

३ संवेदक तंत्रज्ञान

मातीमधील सर्व अन्नद्रव्याचे प्रमाण अवघ्या १० ते १५ मिनिटांत कळते. हवामानातील तापमान, आर्द्रता, पानांचा ओलावा, सूर्यप्रकाशाची तीव्रता याची माहिती मिळते.

४ न्युट्रीसेन्स आयओटी किट

पोषणद्रव्यांची माहिती मिळते. अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते. उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होऊन उत्पन्न २२ टक्क्यांपर्यंत वाढते.

‘एआय’चे फायदे

  • उपग्रह तंत्रज्ञान, प्लॉट मॅपिंग, स्वयंचलित हवामान केंद्र, आयओटी सेन्सर प्रणालीचा वापर

  • याद्वारे शास्त्रीय पद्धतीने खत आणि पाणी व्यवस्थापन करता येते

  • जमिनीची सुपीकता, पोषणमूल्य आणि दर्जा टिकवता येतो

  • हवामान बदलामुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम वेळीच रोखता येतात

  • कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो

  • शेतीचे रिअल टाइम मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट

उत्पादन वाढेल

‘एआय’च्या वापरामुळे उसाचे उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढविता येते, असा विश्‍वास प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘सुक्रोज पातळी कमी असतानाच बऱ्याचदा उसाची काढणी केली जाते. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे १४ टक्के सुक्रोज झाल्यावरच ऊस काढणीचे संकेत मिळेल. पर्यायाने कारखान्यांमध्ये ऊस आधारित उत्पादनांत वाढ होईल. ज्यामुळे राज्याचे दोन ते अडीच टक्के उत्पादन वाढेल.’’ अगदी एक एकर क्षेत्रावरही प्रयोग यशस्वी करता येईल. केवळ उसापुरते तंत्रज्ञान मर्यादित नसून भविष्यात वेगवेगळ्या पिकांवर याचे प्रयोग केले जाणार आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.

अर्थकारण बदलण्याचा प्रयत्न : शरद पवार

‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस शेतीचा प्रयत्न यातून झाला. यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करत त्यांना सतत मार्गदर्शन करण्यात आले आहे. उसापासून सुरू झालेला प्रयोग इतर पिकांपर्यंत विस्तारण्यात येईल. यात राज्यभरातील शेतकऱ्यांना सहभागी करत त्यांचे अर्थकारण बदलण्याचा प्रयत्न आहे,’’ असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा! विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT