OpenAI and Meta Report AI Misuse in Global Influence Efforts esakal
विज्ञान-तंत्र

OpenAI Misuse : ओपन एआयने परतवले ५ हल्ले; सुरक्षा अहवालातून धक्कादायक खुलासा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

OpenAI Report : फेसबुक, इन्स्टाग्रामवर संशयास्पद मजकुराचा वापर वाढला

सकाळ डिजिटल टीम

OpenAI : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वेगानं प्रगती करत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणेही तितकेच महत्वाचे आहे. याबाबत आघाडीच्या रांगेत असलेल्या OpenAI या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा चुकीच्या हेतूने वापर करण्याच्या पाच प्रयत्नांना रोखले आहे.

रशिया, चीन, इराण आणि इजरायल या देशांमधील संशयास्पद संस्थांनी "फसव्या कारवायांसाठी" कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा प्रयत्न केला होता. यात युद्ध, निवडणुका आणि राजकीय परिस्थिती यासारख्या मुद्द्यांवर जनतेचे मत प्रभावित करण्याचा डाव होता.

OpenAI ने या सर्व प्रयत्नांना रोखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली आहे. उपरोक्त संस्थांनी फक्त AI द्वारे तयार केलेली माहिती वापरली नाही तर इंटरनेटवरून कॉपी केलेली चुकीची माहिती आणि मजकूर देखील वापरला होता.

या घटनेमुळे सोशल मीडियावर देखील AI द्वारे तयार केलेली माहिती आढळली आहे. Meta Platforms या कंपनीने देखील आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर "कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या" संशयास्पद मजकुराचा वापर आढळला असल्याचे आपल्या त्रैमासिक सुरक्षा अहवालात म्हटले आहे.

या सर्व घटनांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासोबतच त्याचा सुरक्षित वापर सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे अध रेखांकित होते. OpenAI आणि Meta Platforms यासारख्या संस्थांचे प्रयत्न हेच या क्षेत्रातील सुरक्षित भविष्याची खात्री देतात.

अश्या प्रकारची चुकीची माहिती पसरवून भारता विरुद्ध कारवाया करण्याचे देखील प्रयत्न करण्यात आले होते. भर निवडणुकीच्या काळात अनेक चुकीचे फोटो व्हायरल झाले. त्याचबरोबर Deepfake फोटो लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रयत्न देखील AI कंपनीने रोखला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT