Air Purifier Light Bill eSakal
विज्ञान-तंत्र

Air Purifier : प्रदूषणावर मात करण्यासाठी एअर प्युरिफायर घेतलाय.. पण दिवसभर चालू ठेवणं गरजेचं आहे का?

Air Purifier Light Bill : एक एअर प्युरिफायर साधारणपणे किती वीज खातो, याबाबत तुम्हाला माहिती आहे?

Sudesh

Air Purifier Electricity : देशातील हवेची गुणवत्ता पातळी दिवसेंदिवस खाली चालली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे बाहेरच नाही, तर घरातही स्वच्छ हवा मिळणं अवघड झालं आहे. यामुळेच कित्येक लोकांनी या दिवळीमध्ये एअर प्युरिफायर खरेदी करण्याला प्राधान्य दिलं आहे. मात्र, हा एअर प्युरिफायर साधारणपणे किती वीज खातो, याबाबत तुम्हाला माहिती आहे?

तुमचा एअर प्युरिफायर किती वीज खातो, हे त्याचा आकार, क्षमता, मॉडेल आणि तुमच्या वापरावर अवलंबून आहे. यातील पंख्याचा स्पीड किती आहे यावर देखील त्याचा विजेचा वापर ठरतो. कमी स्पीडवर साधारणपणे एक प्युरिफायर एका तासाला 20W वीज खर्च करतो. तर हाय स्पीडवर एका तासाला 80W वीज वापरली जाते.

24 तास वापरण्याची गरज नाही

तुम्हाला एअर प्युरिफायर हा कायम सुरू ठेवण्याची गरज नसते. एकदा सुरू केल्यानंतर काही मिनिटांमध्ये प्युरिफायर रुममधील हवा स्वच्छ करतो. यानंतर तो बंद करून पुन्हा काही तासांनी सुरू करता येतो. यामुळे वीजही वाचते आणि प्युरिफायर देखील सुस्थितीत राहतो.

विजेची करा बचत

विजेची बचत करण्यासाठी जास्तीत जास्त स्टार रेटिंग असणारा एअर प्युरिफायर घेणं फायद्याचं ठरतं. यासोबतच, तुम्ही एअर प्युरिफायरला टायमर देखील सेट करू शकता, जेणेकरून तो ठराविक कालावधीमध्ये थोडा-थोडा वेळ सुरू राहील. (Tech News)

असा निवडा प्युरिफायर

एअर प्युरिफायर निवडताना क्लीन एअर डिलिव्हरी रेट (CADR) तपासणं देखील गरजेचं आहे. जेवढा CADR जास्त, तेवढ्या वेगाने आणि जास्त हवा स्वच्छ होते. यासोबतच प्युरिफायरची वॉरंटी किंवा गॅरंटी देखील तपासणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT