Airtel-Vi Family Postpaid Plan  
विज्ञान-तंत्र

Airtel-Vi चे फॅमिलीसाठी बेस्ट प्लॅन्स; फ्री कॉलिंग-डेटसह मिळेल बरंच

सकाळ डिजिटल टीम

Airtel-Vi Family Postpaid Plan : सध्या आपल्यापैकी बऱ्याच वापरकर्त्यांना अशा प्लॅनची गरज असते ज्यामध्ये एकाच वेळी सर्व काही मिळेल. जसे की इंटरनेट, अनलिमीटेड व्हॉइस कॉल आणिअतिरिक्त बेनिफिट्स देखील. देशातील दूरसंचार कंपन्या यूजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठीअसे अनेक प्लॅन ऑफर करत आहेत. यातील काही वापरकर्त्यांना प्रीपेड प्लॅन (Prepaid Plans) हवे असतात, तर काही जणांकडून पोस्टपेड प्लॅनला (Postpaid Plan) प्राधान्य देतात.

जर तुम्ही प्रीपेड प्लॅनवरून पोस्टपेडवर शिफ्ट होणयाचा विचार करत असाल, तर तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरु शकते. भारतातील दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Vodafone Idea प्रथमच पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी बेस्ट प्लॅन्स ऑफर करत आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया...

एअरटेल पोस्टपेड प्लॅन्स (Airtel Postpaid Plans)

- यादीतील पहिला प्लॅन इन्फिनिटी फॅमिली प्लॅन 399 आहे जो फस्ट टाईम वापरकर्त्यांसाठी परवडणारा ऑप्शन आहे. एअरटेल 399 रुपये प्रति महिना एक पोस्टपेड प्लॅन ऑफर करते जे अमर्यादितकॉल्ससह 200GB पर्यंत रोलओव्हरसह 40GB मासिक डेटा ऑफर करतो. अमर्यादित कॉलमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगचा समावेश आहे.

याशिवाय यूजर्सना दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये फक्त 1 रेग्युलर सिम मिळेल. हा एअरटेलचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन आहे,परंतु कंपनी या प्लॅनसह काही एअरटेल थँक्स रिवॉर्ड्स देखील देते. वापरकर्ते एअरटेल एक्स-स्ट्रीम अॅप्स प्रीमियम आणि विंकसह जुगरनॉट बुक्स आणि शॉ अकादमीचा एक वर्षासाठी एक्सेस मिळवू शकतात.

एअरटेल असे प्लॅन देखील ऑफर करते जे चांगले फायदे देतात परंतु ते महाग आहेत. असाच एक फॅमिली इन्फिनिटी प्लॅन 1599 रुपयांचा आहे. Airtel चा हा पोस्टपेड प्लॅन ज्यामध्ये 500GB मासिक डेटा सोबत 200GB पर्यंत रोलओव्हर, अमर्यादित कॉल्स आणि 100 SMS दररोज मिळतात. प्लॅन 200 ISD मिनिटे आणि IR पॅकवर 10% सूट देखील मिळते

सदस्यत्व घेतल्यावर, वापरकर्त्यांना 1 नियमित सिम आणि कुटुंबातील सदस्यांसाठी 1 फ्रि अॅड-ऑन नियमित व्हॉइस कनेक्शन मिळते.याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना एअरटेल थँक्स प्लॅटिनम रिवॉर्ड्सचा एक्सेस देखील मिळतो, ज्यामध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1 वर्षासाठी Amazon प्राइम सब्सस्क्रिप्शन तसेच कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1 वर्षासाठी Disney+ Hotstar VIP सब्सस्क्रिप्शन देण्यात येत आहे. इतर बेनिफिट्समध्ये एअरटेल एक्स-स्ट्रीम अॅप प्रीमियम, विंक प्रीमियम आणि बरेच काही देण्यात येत आहे.

Vodafone Idea पोस्टपेड प्लॅन्स (Vi Postpaid Plans)

- Vodafone Idea किंवा Vi इंडिविजुअल कनेक्शन तसेच फॅमिली कनेक्शनसाठी पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. फस्ट टाईम इंडिविजुअल यूजर्ससाठी Vi चा 399 रुपयांचा बेस्ट सेलर प्लॅन घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये 40GB डेटा प्रति महिना 100 SMS/महिना आणि 200GB चा रोलओव्हर डेटा मिळतो. वापरकर्त्यांना या प्लॅनसह Vi Movies आणि TV एक्सेस देखील मिळतो.

Vi द्वारे ऑफर केलेला आणखी एक इंडिविजुअल कनेक्शन प्लॅन हा RedX प्लॅन आहे जो 1,099 रुपयांच्या किमतीत येतो आणि अतिरिक्त बेनिफिट्ससह अमर्यादित डेटा ऑफर करतो. हा प्लॅन दररोज 100 एसएमएस आणि 6 महिन्यांच्या लॉक-इन कालावधीसह येतो.

या व्यतिरिक्त, Vi एक फॅमिली पोस्टपेड प्लॅन (Family Postpaid Plan) देखील ऑफर करते आणि फस्ट टाईम इंडिविजुअल यूजर्स 699 रुपयांचा प्लॅन घेऊ शकतात ज्यामध्ये दोन सदस्यांसाठी कनेक्शन मिळते. हा प्लॅन प्रायमरी कनेक्शनसाठी एकूण 80GB डेटा तसेच दुसऱ्या कनेक्शनसाठी 40GB ऑफर करतो. वापरकर्ते 3000 SMS/महिना सह 200GB पर्यंत रोलओव्हर डेटा मिळवू शकतात. अमर्यादित लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग व्हॉईस कॉल्स सोबत, या प्लॅनमध्ये Wi Movies आणि TV एक्सेस देखील मिळतो.

अमर्यादित डेटा आणि एकापेक्षा जास्त कनेक्शनसह येणार प्लॅन शोधत असलेल्या वापरकर्त्यांसाठी, Vi ची दुसरा RedX प्लॅन 2,299 रुपये प्रति महिना उपलब्ध आहे. यामध्ये अमर्यादित डेटा मिळतो. सोबत प्लॅन कुटुंबातील 5 सदस्यांसाठी कनेक्टिव्हिटी देतो आणि प्रायमरी तसेच दुसऱ्या कनेक्शनसाठी अमर्यादित डेटा आणि व्हॉइस कॉलसह 3000 SMS/महिना मिळतात.

- अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही RedX प्लॅन एकाधिक OTT सब्सक्रिप्शन आणि बरेच इतर बेनिफिट्स ऑफर केले जातात, वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्क न देता टीव्ही आणि मोबाइलवर Netflix चे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये Amazon Prime चे 1,499 रुपये किमतीचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन तसेच Disney+ Hotstar मोबाईलचे 499 रुपयांचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. याव्यतिरिक्त, RedX प्लॅन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये फ्री प्रवेश देखील ऑफर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT