Airtel, Jio and Vi prepaid Plans e sakal
विज्ञान-तंत्र

Jio, Airtel, Vi : कमी किमतीत बेस्ट प्रीपेड प्लॅन; मिळते 3 महिने व्हॅलिडिटी

सकाळ डिजिटल टीम

Airtel, Jio and Vi prepaid Plans : देशातील आघाडीच्या नेटवर्क प्रदाता कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया बाजारात दमदार प्लॅन्स ऑफर करतात. तुम्ही स्वतःसाठी तीन महिन्यांची वैधता असलेला सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर आज या तीन कंपन्यांच्या सर्वात स्वस्त प्लॅनची माहिती जाणून घेणार ​​आहोत. मात्र, गेल्या महिन्यात कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या असून या सर्व प्रीपेड प्लॅन्समध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, डेटा बेनिफिट्स दिले जातात. चला या सर्व प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

रिलायन्स जिओचा (Jio) 395 रुपयांचा प्लॅन:

रिलायन्स जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 6GB डेटा दिला जातो. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये एकूण 1000 एसएमएस देण्यात आले आहेत.

इतर फायद्यांमध्ये तुम्हाला, या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर फ्री एक्सेस दिला जातो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील डेटा कधीही वापरता येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेली खर्च फक्त 4.7 रुपये आहे.

व्होडाफोन आयडियाचा (Vi) 459 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन आयडियाच्या 459 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 6GB डेटा मिळतो. या प्लॅनला 84 दिवसांची वैधता मिळते. व्हॉईस कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. एसएमएसच्या बाबतीत, एकूण 1000 एसएमएस उपलब्ध असून इतर फायद्यांसाठी, या प्लॅनमध्ये VI चित्रपट आणि टीव्हीचा एक्सेस देण्यात आला आहे.

एअरटेलचा (Airtel) 455 रुपयांचा प्लॅन:

एअरटेलच्या 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता दिली जाते. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये दररोज 6GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. एसएमएसच्या बाबतीत, एकूण 900 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला Mobile Edition Free Trial, Apollo 24|7 Circle, Shaw Academy, फ्री Hello Tunes, Wynk Music आणि फास्टॅग रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT