Airtel Jio Vi and BSNL best 3gb daily data prepaid plans that offers ott subscription and many more benefits  
विज्ञान-तंत्र

फक्त एक रिचार्ज, मिळेल 455 दिवसांपर्यंत दररोज 3GB डेटा अन् बरंच..

सकाळ डिजिटल टीम

Best 3gb Daily Data Prepaid Plans : Airtel, Jio, Vi आणि BSNL त्यांच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्लॅन ऑफर करतात. इंटरनेटचा वापर जास्त असलेल्या ग्राहकांना 3GB डेली डेटा असलेले प्लॅन उपयोगी ठरतात. अनेक प्लॅनमध्ये तुम्हाला Disney+ Hotstar आणि Amazon Prime Video सारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा एक्सेस देखील मिळतात. आज आपण Airtel, Jio, BSNL आणि Vodafone-Idea च्या प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगत आहोत ज्यात 3GB डेली डेटा मिळत आहे...

जिओ (Jio) चा 3GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन

- जिओ डेली 3GB डेटासह चार प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन 419 रुपयांचा आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलसह दररोज 3GB डेटा (एकूण 84GB डेटा) आणि दररोज 100 SMS मिळतात. याशिवाय, Jio अॅप्स (JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud) चा एक्सेस देखील 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे.

601 रुपयांचा Jio प्रीपेड प्लॅन देखील आहे जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, अतिरिक्त 6GB डेटा (एकूण 90GB डेटा) आणि दररोज 100 SMS सह दररोज 3GB डेटा मिळतो. 419 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत, 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये 499 रुपयांचे एक वर्षाचे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळते. यामध्ये Jio अॅप्सचा एक्सेसही उपलब्ध आहे.

ज्या वापरकर्त्यांना अधिक वैधता हवी आहे त्यांच्यासाठी, Jio ची 1199 रुपयांचा प्लॅन आहे, जी 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 3GB डेटा (एकूण 252GB डेटा) अमर्यादित कॉल, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सचा एक्सेस देखील उपलब्ध आहे.

ज्यांना एका वर्षासाठी वैधता हवी आहे त्यांच्यासाठी जिओचा 4199 रुपयांचा प्लॅन आहे, जो 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि Jio अॅप्सचा एक्सेस सोबत दैनिक 3GB डेटा (एकूण 1095GB डेटा) उपलब्ध आहे. सबस्क्रिप्शनच्या बाबतीत प्लॅनमध्ये विशेष काही मिळत नाही, फक्त Jio अॅप्सचा एक्सेस मिळतो.

Airtel चे 3GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन्स

- Airtel चा 599 रुपये आणि 699 रुपयांमध्ये 3GB डेली डेटा सह दोन प्रीपेड प्लॅन ऑफर केले जातात. एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉल, दररोज 100 SMS आणि 28 दिवसांची वैधता मिळते. अतिरिक्त फायद्यांमध्ये Disney+ Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन, Amazon Prime Video साठी 30-दिवसांची फ्री ट्रायल आणि इतर Airtel Thanks अॅप फायद्यांचा समावेश आहे.

- 699 रुपयांचा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो, जो 599 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच कॉल आणि टेक्स्ट बेनिफिट्स देतो. प्लॅनचे अतिरिक्त फायदे मात्र वेगळे आहेत, एअरटेल थँक्स अॅपवर Amazon Prime, Xstream मोबाइल पॅक (कोणतेही निवडक चॅनेल – SonyLiv, LionsgatePlay, ErosNow, HoiChoi, ManoramaMax)चा 56 दिवसांच्या एक्सेस मिळतो. Airtel कडे Jio सारखा कोणताही डेली 3GB डेटा नाही वार्षिक प्लॅन नाहीये.

Vi चा 3GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन

- Vi प्रीपेडसाठी 3GB डेली डेटा असलेला प्लॅन 475 रुपयां पासून सुरू होतो. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि अमर्यादित कॉल, दररोज 100 SMS आणि दररोज 3GB डेटा ऑफर करतो. हा प्लॅन Vi च्या Binge All Night कडून फ्लॅगशिप ऑफरसह येते, म्हणजे वापरकर्ते 12 AM ते 6 AM पर्यंत मोफत नाईट सर्फिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच आठवड्याच्या उर्वरित डेटा आठवड्याच्या शेवटी ट्रासफर केला जाऊ शकतो. तसेच, Vi वापरकर्ते दर महिन्याला अतिरिक्त 2GB बॅकअप डेटा क्लेम करू शकतात. सबस्क्रिप्शनच्या बाबतीत, वापरकर्ता Vi Movies आणि TV चा आनंद घेऊ शकतो.

- जर तुम्ही Vi वापरकर्ता असाल तर 28 दिवसांच्या 3GB प्रीपेड प्लॅनसाठी डिस्ने+ हॉटस्टारचे एक वर्षाचे सदस्यत्व हवे असेल, तर तुम्ही 601 रुपयांचा Vi प्रीपेड प्लॅन ​​निवडू शकता. हा प्लॅन 16GB अतिरिक्त डेटासह 475 रुपयांच्या Vi रीचार्जचे सर्व फायदे ऑफर करतो. प्लॅनमध्ये एक वर्षाचे डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

अधिक वैधता हवी असेल तर वापरकर्ते 699 रुपयांचा प्लॅन घेऊ शकतात, जो 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. इतर फायदे रुपये 475 सारखेच आहेत.

जर तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनही दीर्घ वैधतेसह हवे असेल, तर तुम्ही 70 दिवसांच्या वैधतेसह 901 रुपयांचा प्लॅन निवडू शकता. Disney + Hotstar सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, इतर सर्व फायदे 475 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. Jio च्या तुलनेत Vi कडे 3GB डेटा डेटा असलेला कोणताही वार्षिक प्लॅन नाही.

BSNL चे 3GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन्स

- BSNL ग्राहकांना प्लॅन्सचे बेस्ट कॉंबिनेशन ऑफर करते, जे सर्कल्स नुसार बदलतात, त्यापैकी बरेच प्लॅन 3GB डेली डेटा ऑफर करत नाहीत. 94 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75 दिवसांसाठी 3GB डेटा व्यतिरिक्त 100 मिनिटे फ्री व्हॉइस टॉकटाईम मिळतो. 106 रुपयांमध्ये 84 दिवसांसाठी 3GB डेटा उपलब्ध आहे, यामध्ये 100 मिनिटे फ्री व्हॉईस कॉल देखील उपलब्ध आहेत. हे दोन्ही प्लॅन डेली प्लॅन नाहीत.

180 दिवसांच्या वैधतेसह 997 रुपयांच्या प्लॅनचे व्हाउचर हा दररोजचा 3GB डेटा प्लॅन आहे जो अमर्यादित व्हॉइस आणि दररोज 100 SMS देखील ऑफर करतो. मर्यादेनंतर, डेटा स्पीड 80 Kbps पर्यंत कमी होईल.

BSNL चा 2999 रुपयांचा प्लॅन आहे ज्याची वैधता 455 दिवस आहे, ज्यामध्ये अमर्यादित कॉल, दररोज 3GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT