Airtel vs Jio vs Vi prepaid plans  
विज्ञान-तंत्र

Airtel vs Jio vs Vi चे नवीन प्रीपेड प्लॅन; मिळतेय 84 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी

सकाळ डिजिटल टीम

Airtel vs Jio vs Vi prepaid plans : टेलिकॉम ऑपरेटर्स Airtel, Jio आणि Vodafone Idea यांनी दरवाढ लागू केल्यापासून बरेच जण कमी किंमतीत कॉलिंग, डेटा आणि वॅलिडिटी देतील असे स्वतःसाठी परफेक्ट प्रीपेड प्लॅन्स शोधत आहेत. दरम्यान कंपन्यांनी प्लॅनच्या किंमतींसोबत त्यांची वैधता देखील कमी केली आहे. आता, Airtel, Jio आणि Vodafone Idea ने नुकतेच 666 रुपयांमध्ये मध्ये नवीन मिड-रेंज प्रीपेड प्लॅन (prepaid Plans) ऑफर केले आहेत. Airtel आणि Vi त्यांच्या 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता देत आहे, तर Jio त्यांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देते. डेटा आणि कॉलिंग सोबत दोन महिन्यांहून अधिक वैधतेता ऑफर करणारा प्लॅन जर का तुम्ही शोधत असाल तर हे प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.

जिओच्या 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमीटेड कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो. तसेच प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा अॅक्सेस देखील मिळतो. प्लॅनची ​​वैधता 84 दिवस आहे.

Vodafone Idea चा 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे ज्यामध्ये तुम्हाला 3GB डेली डेटा ऑफर केला जातो आणि त्याची वैधता 56 दिवस आहे. यामध्ये अनलिमीटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. Jio त्यांच्या ग्राहकांसाठी 533 रुपयांचा प्लॅन ऑफर करते ज्यामध्ये 56 दिवसांची वैधता, 2GB दैनंदिन डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सचा एक्सेस मिळतो. एअरटेलच्या 549 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन 2GB डेटा मिळतो.तसेच या प्लॅनमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि अपोलो 24 | 7 सर्कलचा एक्सेस मिळतो.

गेल्या आठवड्यात, Vodafone Idea ने 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे चार नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. या प्रीपेड प्लॅन्सची किंमत 155 रुपये , 239 रुपये, 666 रुपये आणि 699 रुपये आहे. हे प्लॅन सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहेत आणि Vi च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

Vodafone Idea vs Airtel vs Jio चे 666 रुपयांचे प्रीपेड प्लॅन

VI च्या 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमीटेड व्हॉइस कॉल्स, 1.5GB डेली डेटा आणि 100 SMS दररोज मिळतात. हे 77 दिवसांसाठी Vi movies आणि टीव्हीचा एक्सेस देखील देण्यात येतो. या प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये Binge All Night Benefits, Weekend Data Rollover Benefits आणि Data Delights ऑफर यांचा समावेश आहे.

Airtel ने आता असाच एक प्रीपेड प्लॅन सादर केला आहे जो 77 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS प्रतिदिन देतो. या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन एक्सेस , अपोलो 24 | 7 सर्कल, शॉ अकादमीचा ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर 100 रुपये कॅशबॅक, फ्री हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिक देण्यात येते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT