Airtel Sakal
विज्ञान-तंत्र

Airtel 5G: एअरटेलने पुणेकरांना दिले नववर्षाचे गिफ्ट, शहरात 5G सेवा सुरू; प्लॅनची किंमत फक्त...

एअरटेलने पुणेकरांना नववर्षाचे गिफ्ट देत शहरात ५जी सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे यूजर्सला ५जी साठी अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

सकाळ डिजिटल टीम

Airtel launches 5G services in Pune: भारतात ५जी सेवा सुरू झाली आहे. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलने देशातील प्रमुख शहरांमध्ये ५जी नेटवर्क उपलब्ध केले आहे. Bharti Airtel देखील ५जी सर्व्हिसचा विस्तार करत आहे. आता कंपनीने पुणेकरांना नववर्षाचे गिफ्ट देत शहरात ५जी सेवा सुरू केली आहे.

हेही वाचा: iPhone Offer: एकच नंबर! अशी ऑफर पाहिलीच नसेल, आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतायत Apple चे डिव्हाइस

Bharti Airtel ने भारतात ५जी सेवा सुरू केली असून, यूजर्सला एकही रुपया अतिरिक्त खर्च न करता हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळणार आहे. कंपनी लवकरच इतर शहरांमध्ये देखील सेवा सुरू करणार आहे. विशेष म्हणजे पुणेकरांना ५जी चा वापर करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. यूजर्स ४जी प्लॅन्समध्येच Airtel 5G Plus चा आनंद घेऊ शकतात.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Airtel 5G सेवा सध्या पुण्यातील कोरगाव पार्क, कल्याण नगर, बाणेर, हिंजेवाडी, मगरपट्टी, हडपसर, खराडी, मॉडेल कॉलनी, स्वारगेट, पिंपरी-चिंचवडसह इतर भागात सुरू झाली आहे. कंपनी शहरातील इतर भागात देखील लवकरच सेवा सुरू करणार आहे. यामुळे आता यूजर्सला हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. यूजर्सला ४जी च्या तुलनेत २० ते ३० पट अधिक हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळेल.

यूजर्सला हाय क्वालिटी व्हीडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टीपल चॅटिंग आणि इंस्टंट अपलोडिंगचा फायदा मिळेल. कंपनीनुसार, Airtel 5G Plus मुळे शिक्षण, आरोग्य, कृषि क्षेत्रातही मोठा बदल पाहायला मिळेल. दरम्यान, लक्षात घ्या की ५जी नेटवर्कसाठी तुम्हाला एअरटेल सिम अपग्रेड करण्याची गरज नाही. तुमच्या फोनमध्ये ५जी सपोर्ट आणि व्हॅलिड ४जी प्लॅन असणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT