Bharti Airtel आणि Reliance Jio एक दूसऱ्याचे तगडे स्पर्धक आहेत. या दोन्ही टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक Prepaid Plans ऑफर करत असतात.अनेकदा Airtel चांगले ऑफर देतो तर काही वेळा Jio चे स्वस्त ऑफर ग्राहकांच्या अधिक पसंतीस उतरतात. जियो ही सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे तर एअरटेल ही एवरेज रेवन्यूवर यूजर असलेली कंपनी आहे.
जर तुम्ही लास्ट लॉंग प्रीपेड प्लान मोठ्या वॅलिडीटीसोबत पाहत असाल आणि OTT बेनिफीट्स सोबत घेण्याचा विचार करत असाल तर एअरटेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण वर्षाच्या शेवटी एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणलाय. हा प्लॅन वर्षभरासाठी असून सतत रिचार्च करण्याचा त्रासापासून तुम्ही मुक्त रहाल.
Airtel चा 3359 रुपयांचा Prepaid Plan
Airtel चा 3359 रुपयांचा Prepaid Plan हा वर्षभरासाठी आहे. या प्लॅनची वॅलिडिटी 365 दिवसांची आहे. यासोबतच यूजर्सला मोठ्या प्रमाणात डेटापण मिळणार आहे. या प्लॅनच्या यूजर्सला अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोजचे 100SMS पण दिले जाणार आहे.
Airtel चा हा लॉन्ग टर्म प्रीपेड प्लान दररोज 2.5GB डेटा देणार. अॅडिशनल बेनिफिट्समध्ये यूजर्सला वर्षभरासाठी Amazon Prime Video Mobile Edition, Disney+ Hotstar Mobileचे सब्सक्रिप्शन दिले जाणार.
कस्टमर्सला Wynk Music चा एक्सेस पण फ्री दिला जाणार. एयरटेलच्या यूजर्सला या प्लॅनसोबत Apollo 24|7 Circle चे सब्सक्रिप्शन 3 महीन्यासाठी फ्री दिले जाणार. याशिवाय FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक पण मिळणार.
Reliance Jio आपल्या कस्टमर्सला लॉन्ग टर्म प्रीपेड प्लानसोबत कोणतेही ऑफर देत नाही. कंपनी सुरवातीला Disney+ Hotstarचं सब्सक्रिप्शन द्यायची. मात्र आता हा ऑफर सर्व प्रीपेड प्लानवरुन हटविण्यात आला आहे. अशात युजर्सला एयरटेलचा प्रीपेड प्लॅन उत्तम वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.