akola marathi news how to remove online ads on facebook and google on mobile 
विज्ञान-तंत्र

ऑनलाईन जाहिरातींचा तुम्हाला कंटाळा येतोय का ? डोन्ट वरी, करुन पहा हे सोपी उपाय!

रोहित कणसे

पुणे: कोरोना महामारीच्या संकटानं जगभरात थैमान घातलं अन्  जगभरातल्या प्रत्येकाला आपल्या घरातच अडकून पडावं लागलं, पण  त्याचा परिणाम होणारच होता आणि तो झालाही. या काळात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढू लागला.

मग सोबतच सोयीनं ऑनलाईन शॉपिंग देखीलही आलंच.  आधीच मोबाईलमध्ये असलेल्या असंख्य अॅप्सच्या मदतीने आपण घरबसल्या हवी ती वस्तू पाहू लागलो आणि ती विकतही घेऊ लागलो.

पण, तुम्ही म्हणाल यात अडचण तरी काय?  तर बघा. तुम्ही तासनतास वेळ शॉपिंग वेबसाईटवर घालवला, असंख्य वस्तू बघीतल्या, त्यातील काही आवडल्या आणि हो त्यापैकी काही तुम्ही घरीसुध्दा बोलवल्या असतीलच.

पण या तुम्ही पाहिलेल्यी सगळ्या वस्तू नंतर तुमची पाठ सोडत नाहीत. तुम्ही शोधलेल्या पाहिलेल्या सगळ्या वस्तूंच्या जाहिराती तुमच्या फेसबुक आणि गुगलवर दिसायला लागल्या. बऱ्याचदा तर तुम्ही ती वस्तू विकत घेतलेली असते तरी त्याची जाहिरात तुमचा पाठलाग सोडत नाही.  उदा एखादा मोबाई एका वेबसाईटवर पाहिला तर त्याच प्रकारचे मोबाईल्सच्या जाहिराती पुढचे बरेच दिवस गुगल आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमचा पिच्छा सोडत नाहीत.

सगळीकडं तेच दिसायला लागतं. ही कसली जादू आहे का? तर नाही. हा गुगल आणि फेसबुकची कमाल आहे, याला जाहिरातीच्या जगात अॅड पर्सनलायझेशन असं म्हणतात आणि हे बंद केलं जाऊ शकतं


ही काय भानगड?  
जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटला भेट देता, कंप्यूटरवर, मोबाईल फोनवर असेल तेव्हा तुम्हाला ज्या जाहिराती दिसतात त्या तुमच्या याआधी इंटरनेटवर तुम्ही काय पाहात होता, त्या माहितीवर आधारीत  विषयांच्या असतात. उदा.  जर तुम्ही एखादे वृत्तपत्र शोधले तर इतर न्यूजपेपर च्या जाहिराती गुगल आणि फेसबुक तुम्हाला दाखवणं सुरु होईल. याला अॅड पर्सनलायझेशन  म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचे आवडीनुसार त्याला त्याच्या हिताच्या  जाहिराती गुगल, फेसबुक दाखवाला लागतं. 

हे कसं शक्य होतं? 
गुगल आणि फेसबुक अक्षरशः तुमच्या इंटरनेटच्या हलचीलींवर पाळत ठेवतात. तुमची हेरगीरी केली जाते सगळ्यांच्या ऑनलाईन वर्तवणूकीतून त्या त्या व्यक्तीच्या पसंतीबद्दल या वेबसाईट माहिती गोळा करतात. इंटरनेट वापरत असतान तुम्ही काय पाहात, किती वेळ पाहता याची नोंद घेतली जाते. जर दुसऱ्या वेबसाईटवर तुम्ही काय केलं याची माहिती गुगला स्वतःहून देतात


जर तुम्हा गुगलचे प्रॉडक्ट, जसं गुगलचं इंटरनेट ब्राऊजर - क्रोम, ऑपरेटींग सिस्टीम (एंड्रॉयड) किंवा गुगलचं सर्च इंजीन वापरत असताल तर गुगल तुमचं इंटरनेटवरील सगळ्या वापराची माहिती स्वतःकडं साठवून ठेवतं. तुम्ही ऑनलाईन केलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद होते. तुम्हा कुठली वेबसाईट किती वेळ पाहिली, त्या वेबसाईटवर काय पाहिलं, त्यात किती वेळ घालवला य़ा सगळ्या लहान-सहान गोष्टींची नोंद होते. एवढंच नाही तर इतर बऱ्याच वेबसाईट ही माहिती स्वतः हून  गुगलला पुरवतात आणि याच माहितीच्या आधारावर तुमचं एक प्रोफाईल तयार केली जाते. या प्रोफाईलच्या अनुरुप जाहिराती तुम्हाला दिसायला लागतात. यालाअॅड पर्सनलायझेशन म्हणतात. 

हे झालं गुगल बद्दल फेसबुक आणि इंस्टाग्राम हे त्याच्या बाहेरील तुमच्या वापराबद्दल माहिती मिळवू शकत नाहीत तरी देखील त्यांच्याकडे तुमच्या बद्दल सर्व प्रकारची माहिती असते. ती कशी तर तुम्ही वापरलेल्या इतर वेबसाईट आणि अॅप ही माहिती फेसबुक-इंस्टाग्रामला पुरवतात. मग या माहितीच्या आधारावर तु गुगलवर असलेल्या असंख्य जाहिराती पैकी प्रत्येक व्यक्तीने मागच्या काही दिवसांमघ्ये सर्च केलेल्या वस्तू आणि सेवांबद्दलच्या खास जाहिराती त्याला दिसण्याची सोय केली जाते.


तुम्ही या जाहिराती थांबवू शकता का? 
तुमच्या आवड-निवड याबद्दलची माहिती गुगल आणि फेसबुक पासून लपवू शकत नाहीत. तसेच गुगलच्या जाहिराती देखील बंद केल्या जाऊ शकत नाहीत मात्र हे अॅड पर्सनलायझेशन  मात्र थांबवता येऊ शकते. तुम्हाला जागोजागी दिसणारे टि-शर्ट जे कदाचीत तुम्हा विकत घेतले आहेत त्याच्या जाहिराती बंद करु शकता. 
अशा टारगेट करणाऱ्या जाहिराती बंद करण्यासाठी फेसबुक सेटिंगमध्ये ‘युवर फेसबुक इन्फॉरमेशन’ हा पर्याय निवडून बंद करु शकता. तर गुगल मध्ये अॅड पर्सनलायझेशन बंद करण्यासाठी तुमच्या गुगल आकाऊंटमध्ये myaccount.gooogle.com  सेटींगमध्ये  अॅड पर्सनलायझेशन  हा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा आणि ते बंद करा. तुम्हाला गुगल आणि फेसबुकवर जाहिराती दिसतील पण त्या तुमच्या ऑनलाईन पाहिलेल्या, शोधलेल्या वस्तूंवर आधारित राहाणार नाहीत तर त्या वेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतील.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT