Whatsapp Photo Editing Feature Sakal
विज्ञान-तंत्र

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फोटो एडिटींग होणार आणखी खास! नवे फिचर लवकरच

Whatsapp Photo Editing Feature: व्हॉट्सअ‍ॅप नवीन फिचर आणण्याचा विचार करत आहे. परंतु यावेळीचे फिचर कॉलशी संबंधित नसून फोटो एडिटिंगशी संबंधित आहे

सकाळ डिजिटल टीम

व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनले आहे. आपल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सॅपही नवनवीन अपडेट्स आणत असते. आताही व्हॉट्सअ‍ॅप काही नवीन फिचर्स (New Features) आणण्याचा विचार करत आहे. परंतु यावेळीचे हे फिचर (Feature) कॉलशी संबंधित नसून फोटो एडिटिंगशी (Photo Editing) संबंधित आहे. लवकरच वापरकर्त्यांना अ‍ॅपमध्येच इमेज पाठवण्याआधी एडिट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतील, त्यामुळे कोणत्याही थर्ड पार्टी किंवा इतर अ‍ॅपवरून फोटो संपादित करून पाठवण्याची गरज भासणार नाही. (Amazing feature related to photo editing is coming on WhatsApp, work will be done in minutes)

WABetaInfo च्या अहवालानुसार, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म इन-बिल्ट मीडिया एडिटरमध्ये दोन नवीन पेन्सिल जोडत आहे. याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर तीन प्रकारच्या पेन्सिल मिळतील. यापूर्वी अ‍ॅपमध्ये वापरकर्त्याला फक्त एक पेन्सिल देण्यात आली होती. परंतु लवकरच वापरकर्त्यांना तीन आकाराच्या पेन्सिल मिळतील ज्या वापरकर्त्यांना फोटो आणि स्क्रीनशॉट संपादनात मदत करतील. एका लीक झालेल्या स्क्रीनशॉटवरून व्हॉट्सअ‍ॅपच्या फोटो संपादन विभागात लवकरच कोणते बदल दिसतील याचे संकेत मिळत आहेत.

ब्लर फिचर्स (Blur Features):

WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन ब्लर फीचर आणण्याची तयारी करत आहे, जे वापरकर्त्यांना फोटो पाठवण्यापूर्वी त्याचे काही भाग ब्लर करण्यात मदत करेल. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते, जर एखादा वापरकर्ता संवेदनशील डेटासह भरपूर स्क्रीनशॉट पाठवत असेल तर ते खूप उपयुक्त ठरू शकते. कारण या फिचरच्या मदतीने तुम्ही फोटो पाठवताना त्यातील एखादी गोष्ट ब्लर करू शकाल. उदाहरणार्थ, संभाषणाच्या मध्यभागी असलेल्या चॅटचा भाग तुम्ही क्रॉप करू शकत नाही. आतापर्यंत वापरकर्त्यांना यासाठी थर्ड पार्टी मीडिया अ‍ॅप्सची मदत घ्यावी लागत होती. आता मात्र हे आता लवकरच संपुष्टात येऊ शकते. ही दोन्ही फिचर्स व्हॉट्सअ‍ॅपवर अजून उपलब्ध नाहीत. नेहमीप्रमाणे, वैशिष्ट्य iOS आणि Android च्या WhatsApp बीटा आवृत्त्यांमध्ये सर्वप्रथम येण्याची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT