Amazon Electronics Festive Sale 2024 Offers,Deals esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Electronics Festive Sale : ॲमेझॉन बंपर सेलचा शेवटचा दिवस! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळतीये चक्क 75% पर्यंतची सूट,ऑफर्स एकदा बघाच

Saisimran Ghashi

Electronics Festive Sale Discount Offers : दिवाळी जवळ आली असून तुमच्या खरेदीला आता Amazon च्या इलेक्ट्रॉनिक्स फेस्टिव्हल सेलने आणखीच खास बनवले आहे. हा सेल सप्टेंबर 6 पासून सुरू झाला असून 10 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच आजपर्यंतच असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन्स, टीव्ही, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 75% पर्यंत सूट मिळवू शकता. फक्त इतकंच नाही तर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डिस्काउंट मिळवून आणखी फायदाही होऊ शकतो.

या सेलमध्ये काय काय मिळणार?

नवीनच लाँच झालेला OnePlus Nord 4 फोन आता अगदी 27,999 रुपये इतक्या किमतीमध्ये उपलब्ध आहे (मूळ किंमत 29,999 रुपये)

रिअलमीचा Narzo 70 Pro 5G हा फोन 18,999 रुपयांच्या जागी 16,249 रुपयांमध्ये मिळत आहे.

43 इंचांचा 4K स्मार्ट टीव्ही Xiaomi च्या Smart TV A Pro 4K मध्ये आता 25,249 रुपये (MRP 42,999 रुपये) इतक्या किमतीमध्ये घरी घेऊन जावू शकता.

Samsung Galaxy M35 5G हा फोन आता 24,499 रुपयांच्या जागी 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Boat AirDopes 311 Pro हे वायरलेस इअरबड्स आता 4,990 रुपयांच्या जागी अगदी 1,199 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Amazfit Active Edge ही स्मार्टवॉच आता 19,999 रुपयांच्या जागी 9,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

आम्ही तर तुम्हाला फक्त काही उदाहरणं दिली आहेत. अशा अनेक आकर्षक ऑफर्स या सेलमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांवर आकर्षक डिस्काउंट देखील मिळत आहे.

आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आणखी जास्त सूट आणि आकर्षक ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 7 दिवसांपासून या बंपर सेलमध्ये ग्राहकांनी ऑफर्सची लूट केली आहे. मग तुम्ही वाट कशाची पाहात आहात? लगेच ॲमेझॉन वर जा आणि तुमच्या आवडीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Project: आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर! फडणवीसांच्या नागपुरातील 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला जाणार

Share Market Opening: यूएस फेडच्या निर्णयामुळे बाजारात तेजी; सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर, निफ्टी प्रथमच 25,500च्या वर

Mumbai Local: ज्येष्ठ नागरिकांना आता लोकलमध्ये धक्के खात प्रवास करण्याची गरज नाही; कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

Tampon And Hygiene: टॅम्पनचा आकार कसा असावा? होताची स्वच्छता कशी ठेवावी? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर

Gmail Account Inactive : उद्या तुमचं Gmail Account होणार बंद! आताच 'असं' करा सुरक्षित, कंपनीनं का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT