amazon great indian festival 2024 smartphone deals esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Great Indian Festival: ॲमेझॉनचा फेस्टिव्ह सेल; आयफोन,सॅमसंग अन् शाओमी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काउंट,ऑफर्स बघाच

Saisimran Ghashi

Great indian festival 2024 smartphone discount offers : देशातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हलपैकी एक असलेलसस ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 27 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये ॲमेझॉन ग्राहकांना फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट देणार आहे.

iPhone 13, Samsung Galaxy S23 Ultra आणि Xiaomi 14 सारख्या टॉप स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. विशेष म्हणजे, Amazon Prime सदस्यांना 26 सप्टेंबरपासून या सेलमध्ये अर्ली ऍक्सेस मिळणार आहे.

ग्राहकांना या डिव्हाइसेस Wishlist मध्ये आगाऊ समाविष्ट करून ठेवता येतील आणि सेल सुरू झाल्यावर त्वरित खरेदी करता येईल. चला तर, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर किती डिस्काउंट मिळणार आहे...

iPhone 13 Smartphone: सुरुवातीची किंमत 79,900 रुपये असलेला iPhone 13 सध्या 49,900 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. पण ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये बँक ऑफर्ससह हा फक्त 37,999 रुपये इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे. हा स्मार्टफोन 6.1-इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले, दमदार Apple A15 बायोनिक प्रोसेसर आणि 12-मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरासह येतो.

Samsung Galaxy S23 Ultra Smartphone: Amazon आपल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Samsung Galaxy S23 Ultra वर मोठा डिस्काउंट देत आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1,49,999 रुपये होती. पण बँक आणि कूपन ऑफर्ससह हा फक्त 69,999 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. या हाय-एंड फोनमध्ये दमदार Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 6.8-इंचचा आकर्षक QHD+ डिस्प्ले आणि 200MP मुख्य सेन्सरसह अत्याधुनिक कॅमेरा सिस्टीम आहे. यात अनेक टेलीफोटो आणि अल्ट्रावाइड लेन्स देखील समाविष्ट आहेत.

Xiaomi 14 Smartphone: Xiaomi 14 ला ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये मोठा डिस्काउंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन 69,999 ॲमेझॉनमध्ये लाँच झाला होता. पण Amazonच्या या सेलमध्ये सर्व डिस्काउंट मिळाल्यानंतर हा फक्त 47,999 रुपये इतक्या कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. या प्रिमियम फोनमध्ये 6.55-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि दमदार Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे. यात 50MP मुख्य सेन्सर, 50MP टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स असलेली ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील आहे.

Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबरडा फोडला

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या

Lohegaon Airport चे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, आता विमानतळ संत तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखले जाणार

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

SCROLL FOR NEXT