Amazon Prime Day Sale 2024  esakal
विज्ञान-तंत्र

Amazon Prime Day 2024 : 'ॲमेझॉन प्राईम डे सेल'ला सुरुवात; आकर्षक डील्स,बंपर ऑफर्स,न्यू लॉन्चेंस अन् बरंच काही

Saisimran Ghashi

Amazon : ॲमेझॉन हे कोट्यावधी ग्राहकांनी पसंत केलेले ई-कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे तिथे तुमच्या लहान मोठ्या सर्व गरजेच्या वस्तू आरामात मिळून जातात. नेहमी वेगवेगळ्या डील्स आणि फ्री डिलिव्हरीचे अनेक पर्याय देखील असतात. ॲमेझॉनचे ग्राहक नेहमीच कंपनीचे कौतुक करताना थकत नाहीत. ग्राहक वर्ग नेहमी वाट बघत असतो सेलचा तर ॲमेझॉन चा प्राईम डिसेल 2024 सुरू झाला आहे.

आज मध्यरात्रीपासून ॲमेझॉन प्राईम डे सेल 2024 सुरू झाला आहे. हा सेल 20 जुलै 2024 पासून 21 जुलै 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लाईव्ह असणार आहे. या सेलमध्ये प्राईम सदस्यांना स्मार्टफोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट्स, घरातील आणि किचन सामान, फर्निचर आणि बरेच काही गोष्टींवर आकर्षक सवलत मिळणार आहेत.

या सेलमध्ये काही खास हायलाइट्स आहेत -

आयफोन 13 फक्त ₹47,799 इतक्या किंमतीत मिळणार.

सॅमसंग गॅलॅक्सी S23 अल्ट्रा 5G फक्त ₹74,999 इतक्या किंमतीत खरेदी करू शकता.

55 इंचांचा सोनीचा टीव्ही फक्त ₹51,999 इतक्या किंमतीत उपलब्ध आहे.

अत्याधुनिक सोनी PlayStation 5 फक्त ₹52,999 मध्ये खरेदी करा.

फक्त ₹1,999 मध्ये 360° स्पेसियल ऑडिओ देणारे boAT ‘निर्वाणा स्पेस’ इअरबड्स उपलब्ध आहे.

अॅमॅजफिट त्यांच्या स्मार्टवॉचेसवर 50-55% पर्यंत सवलत देत आहे. प्रवासी आणि हॉटेल बुकिंगवर 45% पर्यंत कॅशबॅक देखील मिळत आहे. अॅमेझॉन पे वापरून उबर राईड घेतल्यास 5% कॅशबॅक .

या प्राईम डे मध्ये अनेक आकर्षक डील्स आहेत. त्यामुळे लवकरच अॅमेझॉनच्या वेबसाइटला भेट द्या आणि जबरदस्त बचतीचा लाभ घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT