amazon prime video 
विज्ञान-तंत्र

Amazon Prime वर लाइव्ह पाहा इंटरनॅशनल क्रिकेट, कसे ते जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओने 1 जानेवारी 2022 पासून लाईव्ह क्रिकेट स्ट्रीमिंग प्ले (Live Cricket Sreaming) सुरू करण्याची घोषणा केली आहे. Amazon Prime Video ने नोव्हेंबर 2020 मध्ये न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने (Interbational Ceicket) लाइव्ह स्ट्रीम करण्याचे खास अधिकार मिळवले आहेत.

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेपासून लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिला क्रिकेट सामने केवळ प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असणार आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ODI, T20 आणि कसोटी यासह सर्व गेम फॉरमॅट उपलब्ध असतील. जानेवारीपासून भारतातील प्रेक्षकांसाठी न्यूझीलंडमध्ये खेळले जाणारे सर्व क्रिकेट सामने (पुरुष आणि महिला क्रिकेट) स्ट्रीम करणे सुरू करेल.

लाइव्ह मॅच कशी पाहाता येईल

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सामना पाहण्यासाठी प्राइम मेंबर्सना त्यांच्या डिव्हाइसवरील प्राइम व्हिडिओ अॅपवर जावे लागेल.

त्यानंतर त्यांना लाइव्ह क्रिकेट पाहण्यासाठी Carousel मध्ये दाखवलेले सामने पाहाता येतील

तुम्ही सर्च बारमध्ये न्यूझीलंड क्रिकेट सर्च करु शकता.

वापरकर्ते त्यांच्या वेब ब्राउझर, मोबाइल डिव्हाइस, इंटरनेट कनेक्टेड टीव्ही, सेट टॉप बॉक्स, फायर टीव्ही स्टिक आणि इतर कंपेटीबल डिव्हाइसवर देखीलया मॅचेस ऑनलाइन स्ट्रिम करू शकतात.

क्रिकेटप्रेमींना सामन्यांपूर्वी अनेक क्रिकेट प्रोग्रामिंग आणि हायलाइट्स देखील पाहायला मिळतील

यासोबतच मॅच संपल्यानंतर लगेच सर्व्हिसवर मॅचचे हायलाइट्स देखील तुम्ही पाहू शकता.

2022 चे शेड्यूल

प्राइम मेंबर्स फेब्रुवारी 2022 मध्ये भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघांमधली मालिका स्ट्रीम होईल. यासोबतच मेंबर्सना भारत आणि न्यूझीलंड पुरुष क्रिकेट संघांचे सामनेही पाहता येणार आहेत. सध्या ते नोव्हेंबर 2022 साठी शेड्यूल आहेत. पुरुष संघांमध्‍ये जानेवारी 2022 मध्‍ये बांगलादेशची न्यूझीलंड टूर, फेब्रुवारी 2022 मध्‍ये दक्षिण आफ्रिका टूर, मार्च 2022 मध्‍ये ऑस्‍ट्रेलिया टूर आणि मार्च/एप्रिल 2022 मध्‍ये नेदरलँड टूर दरम्यान खेळल्या जाणार्‍या मॅचेस पाहाता येणार आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश जानेवारीमध्ये, भारत विरुद्ध न्यूझीलंड - महिला फेब्रुवारीमध्ये, भारत विरुद्ध न्यूझीलंड - पुरुष नोव्हेंबरमध्ये, दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड फेब्रुवारीमध्ये, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मार्चमध्ये आणि नेदरलँड विरुद्ध न्यूझीलंड मार्च/एप्रिलमध्ये नियोजित आहेत . न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका देखील Amazon Prime Video वर स्ट्रीम केली जाईल. पहिला सामना 1 ते 5 जानेवारी दरम्यान बे ओव्हल, माउंट मौनगानुई, तौरंगा येथे खेळवला जाईल. यानंतर 9 ते 13 जानेवारी दरम्यान क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT